Ladakh viral video woman apologises to Indian Army saam tv
देश विदेश

भारतीय जवानांवर फुकटचा रुबाब झाडला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'त्या' तरुणीने मागितली माफी

Ladakh Viral Video Woman Apologises To Indian Army: लडाखमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर २५ वर्षीय तरुणीने भारतीय लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि लडाख पोलिसांची सार्वजनिक माफी मागितली. संतापाच्या भरात वक्तव्य झाल्याचे तिने स्पष्ट केले.

Omkar Sonawane

लडाखमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या २५ वर्षीय तरुणीने भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लडाख पोलिसांची सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तरुणीने सांगितले की, कोणतीही स्पष्ट माहिती न मिळता अनेक तास प्रतीक्षा करावी लागल्याने निर्माण झालेल्या संतापातून तिच्या तोंडून काही शब्द निघाले. इंडियन आर्मीचा अपमान करण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता, असे ती म्हणाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कारगिल विजय दिवस २६ जुलैच्या आसपास घडली. सुरक्षेच्या कारणास्तव द्रास परिसरातील मिनीमार्ग तपासणी नाक्याजवळ मिनीमार्ग-जोजी ला-सोनमर्ग मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला होता. तरुणीने सांगितले की, ती लडाखहून दिल्लीला जात होती. मात्र, परिसरात VIP येणार असल्याची तिला कोणतीही माहिती नव्हती. सकाळी तब्बल तीन ते चार तास प्रतीक्षा केल्यानंतर तिने एका सैनिकाकडे रस्ता कधी सुरू होईल, अशी विचारणा केली. त्यावेळी आणखी एक तास वाट पाहावी लागेल, असे तिला सांगण्यात आले. मात्र एक तास उलटूनही रस्ता सुरू करण्यात आला नाही.

तब्बल सहा तास ताटकळत ठेवल्याने प्रवाशांचा संयम सुटला. तसेच बाथरूम आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती, असे तरुणीने सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुणी सुरक्षा कर्मचाऱ्यांना एका मंत्र्याच्या वाहनाला पुढे जाण्याची परवानगी दिली जात असल्याबाबत प्रश्न विचारताना दिसत होती. तर सामान्य नागरिकांना का थांबवण्यात आले, असा सवाल तिने केला होता. या व्हिडिओमध्ये तिने, ‘आम्ही Gen Z आहोत, आम्ही ही बकवास सहन करणार नाही, असे म्हटले होते. या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना तरुणीने सांगितले की, तिच्या मागे उभे असलेले काही लोक तिला प्रोत्साहन देत होते आणि त्यावेळी रागाच्या भरात हे शब्द तिच्या तोंडून निघाले.

तरुणीने संतापाच्या भरात केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे मान्य केले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झालेल्या टीकेमुळे आपण मानसिकदृष्ट्या खचल्याचेही तिने सांगितले. संपूर्ण प्रकरण इतक्या नकारात्मक पद्धतीने मांडले गेले की मी डिप्रेशनमध्ये गेले. मी एक सामान्य २५ वर्षांची मुलगी आहे. ही गोष्ट इतकी वाढेल, याची मला कल्पना नव्हती. देशातील सर्व नागरिकांची, भारतीय लष्कराची, जम्मू-कश्मीर पोलिसांची, लडाख पोलिसांची आणि विशेषतः उमर अब्दुल्ला यांची मी हात जोडून माफी मागते,’ असे तिने म्हटले. भारतीय लष्कराचा आपल्याला मनापासून आदर असून आपल्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आपण अत्यंत लज्जित असल्याचेही तरुणीने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! 'या' ७ चुका टाळा, नाहीतर रोजचा १ कप चहा पिणेही होईल बंद

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

SCROLL FOR NEXT