Ladakh administration announces creation of five new districts to enhance governance and development saam tv
देश विदेश

मोठी बातमी! राज्यात होणार 5 नवीन जिल्हे; लडाखच्या उपराज्यपालांची घोषणा

Five New District : लडाखचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. ही घोषणा त्यांनी ट्विटरवरील एका पोस्टद्वारे केली

Bharat Jadhav

  • लडाखमध्ये ५ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार

  • जिल्ह्यांची एकूण संख्या ७ पर्यंत वाढणार

  • उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची घोषणा

लडाखच्या उपराज्यपालांनी पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठीच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ही घोषणा केली आहे. या पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे लडाखमधील जिल्ह्यांची एकूण संख्या आता सात होणार आहे. या निर्णयामुळे शासन नागरिकांच्या अधिक जवळ येईल आणि विकास, रोजगार व उद्योजकतेसाठी नवीन संधी निर्माण होतील, असे सक्सेना म्हणालेत.

लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे :

नुब्रा

शाम

चांगथांग

झांस्कर

द्रास

उपराज्यपाल व्ही. के सक्सेना यांनी आपल्या सोशल मीडियाच्या एक्स या प्लॅटफॉर्मवर लिहिले की, लडाखसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मी लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या सूचनेला मुंजरी दिली आहे. यामुळे लडाखच्या लोकांच्या आकांक्षा आणि प्रदीर्घ काळापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. नुब्रा, शाम, चांगथांग, झांस्कर आणि द्रास या पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे लडाखमध्ये आता दोनऐवजी सात जिल्हे असणार आहेत. हा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित आणि समृद्ध लडाखच्या दूरदृष्टी आहे."

तळागाळापर्यंत शासकीय योजना पोहोचतील

उपराज्यपालांनी पुढे लिहिले, "गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालयाने ऑगस्ट २०२४ मध्येच मंजूर केलेला हा परिवर्तनकारी निर्णय तळागाळातील प्रशासनाला बळकट करेल. प्रशासनाचे विकेंद्रीकरण करेल आणि लडाखच्या लोकांना विशेषतः जे दुर्गम भागात राहतात त्यांना सार्वजनिक सेवांचा जलद आणि निश्चित पुरवठा होईल.

आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये उपराज्यपाल म्हणाले की, नवीन जिल्ह्यांची निर्मितीमुळे सामान्य व्यक्तींपर्यंत शासन पोहोचेल. विकास, रोजगार आणि उद्योगाच्या नवीन संधी निर्माण होतील. या ऐतिहासिक निर्णयाचा लाभ लडाखच्या प्रत्येक नागरिकाला होईल. आपण सर्व मिळून एका उज्ज्वल, अधिक सामर्थ्यवान आणि अधिक समृद्ध भविष्याकडे वाटचाल करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT