Kolkata Law College Case Saam TV News
देश विदेश

Kolkata Law College: हॉकी स्टिकनं मारलं, अब्रूचे लचके तोडले, व्हिडिओ काढला; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? पीडितेनं सगळंच सांगितलं

Kolkata Law College Horror: कोलकाता लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार. टीएमसी युवक नेतेसह तिघांना अटक. व्हिडिओ शूट करून जीवे मारण्याची धमकी. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस तपास सुरू.

Bhagyashree Kamble

कोलकाता येथील एका नामांकित लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये २४ वर्षीय विद्यार्थिनीवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. पीडितेने पोलिसांना आपबिती सांगत घटनाक्रम सांगितला. लग्नाला नकार दिल्यामुळे आरोपींनी तिच्यासोबत जबरदस्ती केली. तसेच व्हिडिओही शूट केला. क्रूरतेची परिसिमा गाठल्यानंतर आरोपींनी पीडितेला हॉकी स्टिकनेही मारहाण केली. तसेच मुख्य आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेनं सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजित मिश्रा या घटनेचा मुख्य आरोपी आहे. तो टीएमसीपी युनिटचा सदस्य आहे. त्याने आधी तरूणीवर बलात्कार केला. नंतर हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली आणि व्हिडिओही शूट केला. 'पोलिसांना सांगितलं तर, ठार मारेन' अशी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं पीडितेनं सांगितलं. या घटनेनंतर पोलिसांनी तपास करीत आरोपींचे मोबाईल जप्त केले. तसेच फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवले आहेत.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने मुख्य तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मनोजित मिश्रा, झैब अहमद आणि प्रमित मुखर्जी अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. मनोजित मिश्रा या घटनेचा मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकून न्यायलयात हजर केलं. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तसेच पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांना माहिती देताना पीडिता म्हणाली, 'त्याने माझ्याशी लैंगित संबंध ठेवण्याच्या उद्देशाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी नकार दिला. त्याला मागे ढकललं. मी रडले, मला जाऊ देण्यास सांगितलं. पण मला डांबून ठेवलं. त्यांना माझा एक बॉयफ्रेंड आहे आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे, असंही सांगितलं. पण नराधमांनी काहीही ऐकलं नाही'. असं पीडितेनं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT