dog  अरुण जोशी
देश विदेश

Dog Abuse in Kolkata : संतापजनक! 60 वर्षीय आजोबांचं किळसवाणं कृत्य; पाळीव कुत्रा घरात एकटा असल्याचं पाहून केलं...VIDEO VIRAL

शेजाऱ्यांपैकी एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ रोकॉर्ड केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Crime News : कोलकत्ता येथील सोनारपूरमधल्या चौहाती पायराबगन परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीने आपल्या घरातील पाळीव कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिवर व्हायरल झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Kolkata)

शेजारच्यांनी गपचूप काढला व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, रतिकांत असं संबंधित ६० वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. घरामध्ये ते आणि त्यांचा पाळीव कुत्रा एकटा असताना त्यांनी त्याच्यावर बलात्कार केला. यावेळी घरातून कुत्र्याचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता.

त्यामुळे शेजारच्यांनी घरात डोकावून पाहिले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार झाल्याचे समजले. शेजाऱ्यांपैकी एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ रोकॉर्ड केला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी सांगितले आहे की, सदर व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून या कुत्र्यावर अत्याचार करत आहे. अनेक व्यक्तींनी या बाबत त्यांची समजूत काढली होती.

मात्र तरी देखील ६० वर्षीय रतिकांत यांनी हा प्रकार थांबवला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली. तसेच पोलिसांनी रतिकांत यांना अटक केली असून कुत्र्याची सुटका करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

SCROLL FOR NEXT