Crime News Saam TV
देश विदेश

Kolkata Crime News: गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमधील कडाक्याच्या भांडणात मुलीच्या कुटुंबीयांची एन्ट्री; तरुणाला बेदम मारहाण करत कापले ओठ

Crime News: बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर पोलीस स्टेशन अंतर्गत तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल करण्या आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Boyfriend Lip Cut: कोलकत्ता (Kolkata) येथून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमधील वाद सर्वांनाच माहिती आहेत. एकमेकांवर प्रेम करणारे काही प्रेमी युगुल एकमेकांसोबत हाणामारी करताना देखील दिसतात. प्रेमाच्या नात्यातून आतापर्यंत अनेक मुलींवर अन्याय झाल्याच्या घटना तुम्ही पाहिल्या असतील. मात्र कोलकत्ता येथून गर्लफ्रेंडशी भांडण करणे एका बॉयफ्रेंडच्या चांगलेच अंगाशी आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोलकत्ता येथील काशीपूर या गावात एक तरुण आणि तरुणी गेल्या ५ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वी या दोघांचे जोरदार भांडण झाले. मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी मुलाला घरी बोलावले.

तरुणाचे ओठ कापले

तरुणाला घरी बोलावून मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांनी क्रूरतेने तरुणाचे ओठही कापले आहेत. सध्या तरुण गंभीर जखमी असून जवळच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर पोलीस स्टेशन अंतर्गत तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बुधवारी ही थरारक घटना घडली आहे. प्रेयसी आणि प्रियकरातील भांडण सोडवण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला घरी बोलावले होते. यावेळी दोघेही एकमेकांवर आरोप करत राहिले. यात तरुणीच्या कुटुंबीयांचा राग अनावर झाल्याने त्यांनी क्रूरतेचा कळस गाढला. तरुण आपल्या घरी पोहचल्यावर त्याचे आई बाबा त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून हादरुन गेले.

सध्या तरुणावर बोलपूर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र येथील डॉक्टर त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचार करत नाहीत असा आरोप तरुणाचे नातेवाईक करतायत. तसेच यामुळे शुक्रावरी नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आंदोलन देखील केले. पोलिस या प्रकरणी अधिक चौकशी करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली, १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू, नाशिकमध्ये वैदकीय क्षेत्रात खळबळ

Warehouse collapse: गोदामाचे छत कोसळून 9 जणांचा मृत्यू; 15 जण अजूनही मलब्याखाली

Shocking : "आई मला माफ कर..." नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; तो शेवटचा व्हिडिओ पाठवला अन्...

Indrajaal : 'इंद्रजाल'चा फर्स्ट लूक; गुप्त खजिन्याचा शोध लागणार? कोण-कोणते कलाकार झळकणार?

SCROLL FOR NEXT