Khalistani Leader Pannu Threat The Hindu
देश विदेश

Punjab CM Threat: बॉम्बने उडवून देऊ; खालिस्तानी पन्नूची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

Khalistani Leader Pannu Threat: मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी पंजाब पोलिसांना सतर्क केले होते. टिफिन, ड्रोन किंवा महिला मानवी बॉम्बने हल्ला केला जाऊ शकतो, अशी माहिती एजन्सींना मिळाली आहे.

Bharat Jadhav

खालिस्तानी सिख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपवंत सिंह पन्नूने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांची स्थितीही माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह सारखी होईल. मान यांनाही बॉम्बने उडवून देऊ. पन्नूने व्हिडिओतून मुख्यमंत्र्यांना धमकी दिलीय. दरम्यान तीन दिवसांपूर्वीच सुरक्षा यंत्रणांनी पोलिसांना मुख्यमंत्र्यावर हल्ला होऊ शकतो, याबाबत सूचना दिलीय. टिफिन, ड्रोन किंवा महिला मानवी बॉम्बने मुख्यमंत्र्यांवर हल्ला होण्याची भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केलीय.

मुख्यमंत्री भगवंत मान प्रजासत्ताक दिनी फरीदाकोटच्या नेहरू स्टेडियमवर तिरंगा फडकावतील. आम्ही तेथे खालिस्तानी घोषणा दिल्यात.शिख तरुणांना तिरंगा हातात न घेता खलिस्तानी झेंडाच हातात घ्यावा. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आले आहे, सरकार बदलल्यानंतर खूप काही बदलत असतं. पंजाब भारताच हिस्सा नाहीये, असं पन्नूने आपल्या व्हिडिओत म्हटलंय.

शेतकरी आंदोलनात बसलेल्या तरुणांनी अमृतसर, गुरुदासपूर आणि जालंधर जिल्ह्यातील डीसी कार्यालयात खलिस्तानचे झेंडे फडकावले पाहिजेत जेणेकरून पंजाबमधील संदेश थेट डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचू शकेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धर्म आणि राजकारणात शीख आणि भारत सरकारमध्ये मोठा फरक असल्याचा संदेश मिळेल, असं पन्नू म्हणालेत.

तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी पंजाब पोलिसांना सतर्क केले होते.टिफिन, ड्रोन किंवा महिला मानवी बॉम्बने हल्ला केला जाऊ शकतो, अशी माहिती एजन्सींना मिळालीय. वारीस पंजाब दे संघटनेचे प्रमुख आणि खडूर साहिबचे खासदार अमृतपाल सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्रीही फुटीरतावादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत.

तर खलिस्तानी नेता पन्नू याच्याकडून धमकी मिळाल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात बदल करण्यात आलाय. आता मुख्यमंत्री फरीदकोटमध्ये तिरंगा ध्वज फडकावणार नाहीत.

महाकुंभमध्ये हल्ला करणार - पन्नू

काही दिवसांपूर्वी खालिस्तानी गुरवंत सिंह पन्नूने अशाच धमकी देणार व्हिडिओ व्हायरल केला होता.पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन खलिस्तानी दहशतवादी मारले गेले होते. ते हे निरपराध तरुण असल्याचं सांगत प्रयागराज येथील महाकुंभात याचा बदला घेणार असल्याची पन्नूने दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT