Salman Chishti, Ajmer Dargah Khadim calling for the beheading of Nupur Sharma
Salman Chishti, Ajmer Dargah Khadim calling for the beheading of Nupur Sharma Twitter/@FabulasGuy
देश विदेश

Video: नुपूर शर्मांचा शिरच्छेद करणाऱ्याला माझं घर देईन; अजमेर दर्ग्याच्या खादिमांचं वादग्रस्त विधान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजस्थान: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद जगभरात उमटले. भारतातही अनेक ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण झाला आणि अजूनही या घटना थांबायचं नाव घेत नाहीये. "नुपूर शर्मा यांचं शीर कापून आणणाऱ्याला मी माझं घर देईन" असं खळबळजनक आवाहन एका खादिमांनी केलं आहे. जगप्रसिद्ध सूफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्याच्या (Ajmer Sharif Dargah) खादिमांनी नुपूर शर्माला ठार मारण्याची धमकी दिली आहे. दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांचा व्हिडिओ वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. खुद्द सलमान चिश्तीने हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. (Salman Chishti On Nupur Sharma News)

हे देखील पाहा -

गंभीर बाब म्हणजे हा व्हिडिओ उदयपूरमधील मोहम्मद रियाझ आणि गौस मोहम्मद यांनी बनवलेल्या व्हिडिओसारखाच आहे. २ मिनिटे ५० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सलमान चिश्तीने नुपूर शर्मावर धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली ​​आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजमेर शहरात चर्चांना उधाण आलं असून शहरात तणाव आहे.

व्हिडिओमध्ये शीर कापून आणण्याचं आवाहान

या व्हिडिओमध्ये खादिम सलमान चिश्ती हा नुपूर शर्माला गोळ्या घालून ठार मारण्याबाबत बोलत आहे. तसेच सलमान चिश्तीने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, जो कोणी नुपूर शर्माची हत्या करेल, त्याला बक्षीस म्हणून पैसे आणि घर देईल. सलमान चिश्तीने नुपूर शर्माचे शीर कापणाऱ्याला त्याचे घर देण्याचा दावा आहे. सलमान चिश्तीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात चर्चा रंगली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचे म्हणणे आहे की, ज्या दर्ग्यासाठी नेहमी सांगितले जात होते की येथून शांतता आणि बंधुतेचा संदेश दिला जातो, त्याच दर्ग्याच्या खादिमांनी असे व्हिडिओ जारी केल्यास त्याचा विपरीत परिणाम लोकांवर होईल. लोकांनी सांगितले की, विनाकारण दहशत पसरवण्यासाठी तालिबानी पद्धतीने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, ज्यामुळे केवळ शहरातीलच नाही तर इतरत्रही वातावरण बिघडेल.

खादिम सलमान चिश्तीचे लोकेशन काश्मीरमध्ये

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजमेर शहरातील अलवर गेट पोलिस ठाण्यात सलमान चिश्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे. एएसपी विकास सांगवान यांनी सांगितले की, सलमान चिश्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. सध्या सलमान चिश्तीचं लोकेशन काश्मीरमध्ये दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यावरही तपास सुरू आहे. त्याचवेळी असे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanju Samson Statement: कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही संजूने या खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

Adani Group News: अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस, नेमकं काय आहे कारण?

Today's Marathi News Live : नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार, गणेश नाईक देखील उपस्थित असणार

Marathwada Water Crisis: चिंताजनक! मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र; १२ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

Sushma Andhare Helicopter Crash | सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे सुखरूप

SCROLL FOR NEXT