Kerala Train Tragedy Saam Tv
देश विदेश

Kerala Train Fire News: क्षुल्लक कारणावरुन धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशाला जाळलं; लहानग्यासह तिघांचा मृत्यू

Kerala Train Tragedy : अलप्पुझा - कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kerala Train Tragedy : केरळमध्ये धावत्या ट्रेनमधील एक थरारक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका प्रवाशाने एक सहप्रवाशाला पेटवून दिलं. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे, तर आठ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अलप्पुझा - कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे.

मिळाले्ल्या माहितीनुसार, कोझिकोडमध्ये रविवारी अलप्पुझा - कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरुन दोन प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झालं. वाद इतका टोकाला गेला की एक प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला पेटवून दिले. पेटवून दिलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

सोबतच अपघातात किमान आठ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी दिली आहे. मात्र ट्रेन ज्यावेळी कन्नूर स्टेशनवर पोहोचली तेव्हा प्रवाशांनी सांगितलं की घटनेनंतर एक महिला आणि एक मुलगा बेपत्ता आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला. तब्बल चार तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळले.

ट्रेनमध्ये सुरु असलेल्या वादानंतर काही प्रवाशांनी इमर्जन्सी चेन ओढली. चेन ओढल्यानंतर ट्रेनचा स्पीड कमी झाला. त्यावेळी आरोपीने हीच संधी साधत रेल्वेतून उडी मारून पळ काढला. आरोपीची ओळख पटू शकली नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय क

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

SCROLL FOR NEXT