Mobile Blast News
Mobile Blast News Saam tv
देश विदेश

Mobile Blast News: मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर सावधान! ८ वर्षाच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर; हातातचं झाला स्फोट अन्...

Gangappa Pujari

Keral News: लहान मुलांना लागलेले मोबाईलचे वेड हा सध्या सर्वत्रच चिंतेचा विषय ठरत आहे. गेम खेळण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी लहान मुले नेहमीच मोबाईलची मागणी करतात. ज्यांच्या हट्टापुढे अनेकदा पालकांनाही हार मानावी लागते. मात्र मोबाईल वापरताना अनेकदा अशा काही घटना घडतात. ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही.

केरळमधून अशीच एक धक्कादायक आणि भयंकर घटना समोर आली असून या घटनेत ८ वर्षीय चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू.. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, केरळमधील (Kerala) त्रिशूरमध्ये ही घटना घडली असून तिसरीत शिकणारी अदित्यश्री (वय, ८) ही विद्यार्थिनी मोबाईल चार्जिंगला लावून व्हिडिओ पाहत होती. याचवेळी मुलीच्या हातातल्या फोनचा जोरात स्फोट झाला (Mobile Blast) ज्यामध्ये ती जखमी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर या मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी हा फोन विकत घेण्यात आला होता अशीही माहिती समोर आली आहे. तसेच एक वर्षापूर्वी तिची बॅटरी बदलण्यात आली होती. मोबाइलचा स्फोट झाला तेव्हा मुलगी आपल्या आजीसोबत होती. स्फोट झाल्यानंतर मुलीच्या हाताला आणि चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flipkart Big Saving Days Sale च्या आधीच iPhone 14, iPhone 12 वर मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कशाला हवं? इथं कट्टर विरोधकही धरतात एकमेकांचे पाय

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

SCROLL FOR NEXT