KERALA SAAM
देश विदेश

Kerala: पँन्ट काढायला लावली, गळ्यात पट्टा बांधला अन् पैसे...; कंपनीचे कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन, VIDEO ने खळबळ उडाली

Kerala Government Cracks Down on Workplace Harassment: केरळमधील एका फर्ममधील कर्मचार्‍यांना पट्टा बांधून रांगायला लावलं, पाणी चाटायला लावलं; संतापजनक व्हिडिओ व्हायरल

Bhagyashree Kamble

केरळमधील एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना अमानुष वागणूक आणि छळ केला आहे. कर्मचाऱ्यांना आधी अर्ध नग्न केलं. नंतर त्यांच्या गळ्यात पट्टा बांधून प्राण्यासारखं गुडघ्यावर रांगायला लावलं. तसेच जमिनीवर ठेवलेल्या भांड्यातून प्राण्यासारखं पाणी प्यायला लावल्याचं व्हिडिमधून दिसून येत आहे. हा सर्व प्रकार कर्मचाऱ्यांच्या मालकांकडून मिळालेल्या शिक्षेचा एक भाग असल्याचे म्हटलं जात आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

केरळचे कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच एर्नाकुलम कामगार विभागाला तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यातील कामगारांसोबत असे वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल, असं मंत्र्यांनी सांगितलं.

प्राथमिक माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पेरूम्बावूरच्या अरक्कापाडी भागात घडली. ही फर्म घरोघरी जाऊन वस्तू विकण्याचे काम करते. व्हायरल व्हिडिओ १२ सेकंदाचा आहे. एका व्यक्तीच्या गळ्यात पट्टा आहे आणि पट्ट्याची दोरी एका व्यक्तीच्या हातात आहे. तो व्यक्ती गुडघ्यावर रांगत आहे. तर, एका प्लेटमध्ये पैसे ठेवले आहेत, आणि ते नाणे एका कर्मचाऱ्याला चाटायला सांगितलं आहे. हा व्हिडिओ तेथील एका कर्मचाऱ्याने शूट केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण एका खासगी मार्केटिंग फर्मशी संबंधित आहे. अद्याप कुणाकडूनही तक्रार आलेली नाही. फर्म मालकाने सांगितलं की, हा छळाचा प्रकार फर्ममध्ये झाला असावा. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

Maharashtra News Live Update: नागपुरात अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटवर भरारी पथकाचा छापा

Stop eating onions: 30 दिवस कांदा खाल्ला नाही तर शरीरात घडतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

Rain Alert : राज्यात पुढील काही दिवसांत धो धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा

SCROLL FOR NEXT