Kerala blast news today Saam TV Marathi
देश विदेश

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Kerala blast news today : केरळमधील त्रिशूर येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. बचावकार्य सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे.

Namdeo Kumbhar

Kerala Firecracker Factory Blast : केरळमध्ये फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण ५ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्रिशूर येथील फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी ही दुर्घटना घडली. कारखान्यात अचानक स्फोट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या दुर्दैवी घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातील मृताची ओळख पटवण्याचे काम करण्यात येत असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

थ्रिसूर पूरम उत्सवासाठी फटाके तयार केले जात होते. तयार झालेले फटाके एका गोदामात ठेवले होते. याच गोदामात अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात जिकडे तिकडे धूर दिसला. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल, बचाव पथके आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड येथील फटाक्यांच्या गोदामात आज अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेतील १३ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (KSDMA) दिली. मंघलवारी मुंडाथिकोडमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला त्यावेळी ४० जण काम करत होते.

दरवर्षी होणाऱ्या त्रिशूर पूरम उत्सवासाठी कारखान्यात फटाके तयार केले जात होते. दुपारी फटाके तयार करताना अचानक स्फोट झाला. त्यानंतर एकच हाहाकार माजला. स्फोटाचे आवाजाने संपूर्ण परिसर हादरला होता. स्थानिकांकडून तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. पण आग काही आटोक्यात येत नव्हती. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. काहीजणांची प्रकृती गंभीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

Maharashtra News Live Update: धुळे मनपा आयुक्तांचा आक्रमक पवित्रा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन

Summer AC Settings: उन्हाळ्यात AC कितीवर ठेवला पाहिजे? लाईटबिल होईल अर्ध

SCROLL FOR NEXT