Kerala Crime news Saam Tv
देश विदेश

पैसे न दिल्याचा राग; काँग्रेस महिला नेत्याच्या मुलाकडून आईवरच वार, चाकूने संपवण्याचा प्रयत्न

Shocking Incident: काँग्रेस महिला नेत्या ग्रेसी जोसेफ यांच्यावर मुलाकडून चाकूने सपासप वार. मुलगा शेफिन फरार. घराकडे परतलाच नाही.

Bhagyashree Kamble

  • कोचीतील काँग्रेस नेत्या ग्रेसी जोसेफ यांच्यावर मुलानं चाकूने हल्ला केला

  • पैशांच्या वादातून कलूर भागात ही धक्कादायक घटना घडली

  • ग्रेसी गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचारानंतर घरी परतल्या

  • आरोपी शेफिन फरार, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

माजी नगरसेवक आणि काँग्रेस नेत्या ग्रेसी जोसेफ यांच्यावर त्यांच्याच मुलानं प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना केरळ राज्यातील कोचीच्या कलूर भागातून उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रेसी यांचा मुलगा फरार झाला. पैसे न दिल्याच्या रागाने त्याने आईवर हल्ला केला. सध्या त्यांच्या आईवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शेफिन कलूरमधील 'जज अव्हेन्यू रो़ड'वरील त्याच्या आईच्या दुकानात केला. आईकडे तो पैशांची मागणी करू लागला. ग्रेसीनं पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा आई आणि मुलामध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि शेफिनला राग अनावर झाला.

नंतर शेफिनने आईवर चाकूने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात ग्रेसी गंभीर जखमी झाली. तिच्या अंगावर तीन गंभीर जखमा आढळल्या. हल्ला झाल्यानंतर ग्रेसी यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. मात्र, ग्रेसी यांनी स्वत: तक्रार दाखल करण्यास नकार दिला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्ला केल्यानंतर शेफिन पुन्हा घरात परतलेला नाही. अद्याप तो कुठे आहे, याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. पोलिसांना संशय आहे की, तो व्यसनी आहे. पूर्वी तो व्यसनमुक्ती केंद्रातही राहिला होता. सध्या शेफिनचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत चर्चा नाही, राहुल गांधी आक्रमक

Maharashtra News Live Update: केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चेसाठी CJP रवाना

Kitchen Hacks : फ्रिजमधून घाण वास येतोय ? तर चहापत्तीचा 'हा' भन्नाट उपाय करून पाहा

मोठी बातमी: NEET पेपरफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आक्रमक! केंद्र अन् NTA वर ताशेरे; कोर्टात नेमकं काय घडलं?

Crime: मित्रासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार, जंगलात फिरण्यासाठी गेले असता भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT