Keral Lottery Saam Tv
देश विदेश

रिक्षावाल्याचं नशीब पालटलं! शनिवारी लॉटरी खरेदी केली, रविवारी जिंकले २५ कोटी रुपये

केरळच्या राजधानीतील एका ३० वर्षीय ऑटोरिक्षा चालकाने २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे.

साम वृत्तसंथा

तिरुअनंतपुरम: सध्या नशिब कधी कुणाचे कधी बदलेल हे सांगता येत नाही. अचानक कोण करोडपती होतंय तर काहीजण भिकारी सुद्धा होता. आता अशीच एक घटना केरळमध्ये (Keral) घडली आहे. २४ तासात एक रिक्षा चालक कोट्यधीश झाला आहे. २४ तासापूर्वी हा रिक्षाचालक रिक्षा चालवून पैसे कमावत होता, पण अचानक लागलेल्या लॉटरीमुळे त्याचे नशिब पालटले आहे. शनिवारी लॉटरीचे तिकिट घेतले आणि रविवारी कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागल्याचे समोर आले आहे.

केरळच्या (Keral) राजधानीतील एका ३० वर्षीय ऑटोरिक्षा चालकाने २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. त्यामुळे त्याचे नशिब उघडले आहे. श्रीवरहम मूळचे अनूप बी असं या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांनी शनिवारी संध्याकाळी केरळ राज्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक बक्षीस रकमेचे तिकीट TJ750605 खरेदी केले होते आणि त्यांनी हे तिकिट खरेदी करण्यासाठी त्यांच्या मुलाची भिशी फोडली असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीवरहम मूळचे अनूप बी सांगतात,“मला तिकीट ५०० रुपयांचे घ्यायचे होते पण पैसे कमी पडत होते. मी लॉटरी (Lottery) एजन्सीकडून तिकीट विकत घेतले,अनूप हा एका भोजनालयात स्वयंपाकी म्हणून काम करत होता आणि पुढ त्याने ऑटोरिक्षा चालवण्यास सुरुवात केली. तिथल्या एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून रुजू होण्यासाठी पुढच्या आठवड्यात त्याला मलेशियाचा व्हिसा मिळण्याची अपेक्षा होती. राज्य सरकारची लॉटरी काढण्याआधीच त्याने हे सर्व ठरवले होते. त्याला आता १५.७५ कोटी रुपये मिळणार आहेत.

“मी एका सहकारी बँकेकडून ३ लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. ते मंजूर झाल्याची माहिती त्यांनी काल मला दिली. मी त्यांना आता कळवले आहे की मला ते कर्ज नको आहे,” ओणम बंपर हा ऑटोरिक्षा चालक, कोचीच्या जयपालन पीआरने गेल्या वर्षीही जिंकली होती. अनूपने त्याची चुलत बहीण सुजया ही लॉटरी एजंट असली तरी अटिंगल या भगवती लॉटरी एजन्सीकडून तिकीट खरेदी केले होते. मी निवडलेल्या पहिल्या तिकिटाच्या मालिका क्रमांकावर मी खूश नव्हतो. 750605 हा क्रमांक फॅन्सी नंबरसारखा वाटला, असंही अनुप म्हणाले.

पत्नी माया हिनेच रविवारी दुपारी अनूपला जॅकपॉट जिंकल्याची माहिती दिली. “मी २२ वर्षांचा असल्यापासून लॉटरी खरेदी करत आहे आणि मी अनेक वेळा बक्षिसे जिंकली आहेत. मी याअगोदर सर्वात मोठे जिंकलेले बक्षीस फक्त २,००० रुपये होते, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT