Kerala Bus Viral Video Saam TV
देश विदेश

Kerala Bus Viral Video: शेजारच्या सीटवर बसून तरुणाचे अश्लील चाळे; तरुणीने थेट व्हिडिओ काढत केली पोलखोल

KSRTC Bus: संबंधित तरुणीने या बाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्यावर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

Kerala Viral Video: केरळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या शेजारी असलेल्या तरुणीसमोर हस्तमैथून करण्याचा संतापजनक प्रकार केला आहे. संबंधित तरुणीने या बाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्यावर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. (Viral Video)

केरळच्या (Keral) स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KSRTC) या बसमध्ये हा लाजिरवाणा प्रकार घडला. पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी बसले होते. यावेळी तरुणाने थेट आपल्या पॅन्टचे बटन उघडत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी तो शेजारच्या सीटवर असलेल्या तरुणीला स्पर्श करत होता.

हा घाणेरडा प्रकार पाहून तरुणीचा संताप झाला. तरुणाचं हे कृत्य थेट सर्वांसमोर आणण्यासाठी पीडितेने थेट आपल्या फोनमध्ये ही घटना रेकॉर्ड केली. तरुणीने बसमध्ये (Bus) आरडाओरडा करत त्याची पोलखोल केली. यावेळी तरुण आपण काही केलंच नाही असं म्हणू लागला.

व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे की, बस थांबवून पोलीसांत तक्रार करण्यासाठी जात असताना रस्त्यावर तरुण बस कंडक्टर यांच्यात हातापायी झाली. तसेच तरुणाने तेथून पळ काढला. ही संपूर्ण घटना पीडितेने पोलिसांना सांगितली. मंगळवारी तरुणाचा शोध घेत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT