Kedarnath Helicopter emergency landing  Saam TV
देश विदेश

Kedarnath Helicopter emergency landing : घिरट्या आणि हेलकावे घेत हेलिकॉप्टर खाली आलं; केदारनाथमधील इमर्जन्सी लँडिंगचा थरारक VIDEO

Kedarnath Helicopter Viral Video : रोटर खराब झाल्याचं समजताच पायलटने तातडीने हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. यंत्रणेला याबाबत माहिती मिळताच हेलिकॉप्टरच्या लँडिंगबाबत माहिती देण्यात आली.

Ruchika Jadhav

केदारनाथमध्ये एका हॅलिकॉप्टरचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. यातून ६ व्यक्ती प्रवास करत होत्या. घिरट्या आणि हेलकावे घेत हेलिकॉप्टरचं उंचावरून इमर्जन्सी लँडिंग झालं आहे. या घटनेची दृश्य देखील समोर आलीत. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

१० मेपासून केदारनाथ चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येथे जाण्यासाठी निघालेत. येथे पोहचण्यासाठी काही जण हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. त्यातच आता एका हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरचं रोटर खराब झाल्याने ही घटना घडली आहे. मोठी दुर्घटना घडण्याआधीच पायलटच्या ते लक्षात आले. रोटर खराब झाल्याचं समजताच पायलटने तातडीने हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. यंत्रणेला याबाबत माहिती मिळताच हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी व्यवस्था करण्यात आली होती.

सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पायलटने सावधानतेने हेलिकॉप्टर लँडिंग केलं नसतं तर आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हेलिकॉप्टर डोंगरापासून काही अंतरावर असतानाच घिरट्या आणि हेलकावे घेत आहे. लँडिंगच्या ठिकाणी अन्य काही व्यक्ती या हेलिकॉप्टरचा थरार पाहत आहेत. त्यात पायलटने या हेलिकॉप्टर सुखरूप लँडिंग केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakhi Sawant: 'बिग बॉस मराठी'च्या फिनालेसाठी राखी सावंतची लक्झरी तयारी; दुबईतून घेतला 'इतक्या' लाखांचा डिझायनर ड्रेस

Mumbai-Pune Missing Link: मुंबई पुणे मिसिंग लिंकचे उद्घाटन लांबणीवर जाणार; युद्धामुळे कामावर परिणाम

Maharashtra News Live Update: जगातील उष्ण शहरांच्या यादीमध्ये वर्ध्याचा समावेश

मोठी बातमी! कैसे हराया फेम सहर शेखचे नगरसेवक पद जाणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

High Income Job: शिक्षण कमी आहे म्हणून टेन्शन घेऊ नका! करा हे 5 कोर्स आणि मिळवा लाखोंचा पगार

SCROLL FOR NEXT