Crime News Saam tv
देश विदेश

Mysuru News: पती-पत्नी अन् २ मुली.. घरात एकाच कुटूंबातील चौघांचे मृतदेह; पोलिसही हादरले

Karnataka Latest News: या सर्वांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी सध्या व्यक्त केला असून याबाबतचा अधिक तपास सध्या सुरू आहे

Gangappa Pujari

Karnataka Mysuru Crime: कर्नाटकमधील म्हैसूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हैसूरमध्ये एका भाड्याच्या घरात एकाच कुटुंबातील 4 लोकांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबल उडाली आहे. या सर्वांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी सध्या व्यक्त केला असून याबाबतचा अधिक तपास सध्या सुरू आहे.. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हैसूर (Mysore) शहरात महादेवस्वामी आणि अनिता दोघे दांपत्य राहतात. त्यांना दोन मुलीही आहेत. म्हैसूरच्या बांदिपलयामध्ये महादेवस्वामी यांचे भाज्यांचं दुकान होते. दोन दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. ज्यानंतर रविवारी त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

घरी आल्यावर घराचा पुढील दरवाजा आतून बंद असल्याचे पोलिसांना आढळून आले. मागील दार उघडले असता संपूर्ण कुटुंब मृतावस्थेत पडले होते. यादरम्यान एका मुलीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर उर्वरित जमिनीवर मृतावस्थेत आढळले. (Crime Story)

महादेवस्वामी (४५), त्यांची पत्नी अनिता (३८), मुलगी चंद्रकला (१७) आणि धनलक्ष्मी (१५) अशी या सर्वांची नावे आहेत. या कुटूंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Risks: कोणत्या पदार्थांमध्ये मीठ वरून टाकून खाऊ नये?

एकच प्याला, पण तोही धोकादायक! मद्य प्राशन केल्यास गंभीर आजाराचा धोका, 31st पार्टीआधी डॉक्टरांचा सल्ला वाचाच

Mumbai Infrastructure : कायापलट होणार! बदलापूर, कर्जत ते वसई आणि पनवेल; लोकलच्या १४ प्रोजेक्टसाठी १८३६४ कोटी मंजूर, वाचा

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

Railway News : ट्रेनमध्ये टॉयलेट असते, पण लोकल आणि मेट्रोमध्ये का नाही? वाचा नेमकं कारण

SCROLL FOR NEXT