Karnataka Assembly Election Result 2023 Saam Tv
देश विदेश

Karnataka Assembly Election Result 2023 : बहुमताचा आकडा दिसताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ, सिद्धरामय्या यांच्या मुलाने ठोकला दावा

बहुमताचा आकडा दिसताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ, सिद्धरामय्या यांच्या मुलाने ठोकला दावा

Satish Kengar

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटक  (Karnataka) विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. असं असताना काँग्रेसमध्ये संपूर्ण निकाल हाती येण्याआधीच मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत सुरु झाली आहे.

सिद्धरामय्या यांचा मुलगा यतिंद्र यांनी वडिलांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. माझ्या वडिलांना मुख्यमंत्रीपद मिळायला हवे, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस स्वबळावर सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.

सिद्धरामय्या यांचा मुलगा म्हणाला की, ''भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. कर्नाटकच्या हितासाठी माझ्या वडिलांना मुख्यमंत्री करावे.'' (Latest Marathi News)

काँग्रेसला राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल आणि कुणाच्याही पाठिंब्याची गरज भासणार नाही, असेही यतिंद्र मुलाने आहेत. माझे वडील वरुणा मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी होतील, असे ते म्हणाले.

आतापर्यतच्या मतमोजणीनुसार, काँग्रेस 118 जागांवर आघाडीवर आहे. हा कल अंतिम निकालापर्यत राहिला तर काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करेल. राज्यात बहुमताचा आकडा 113 जागांचा आहे. आत्तापर्यंत भाजपकडे  (BJP) फक्त 73 जागांवर आघाडी आहे.

सीटी रवी, एम नागराजन यांच्यासह सुमारे 8 मंत्री पिछाडीवर आहेत. इतकेच नाही तर भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्रही पिछाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धाने टेन्शन वाढवलं, गणेशमूर्तींच्या पॅकेजिंगसाठी फोम मिळेना; छोटे उद्योजक हवालदील

लोकसभेत मोठा गोंधळ; प्रियंका गांधी बोलत असताना सत्ताधारी आक्रमक|VIDEO

Maharashtra Live News Update : हाॅटेल मधील गॅसचा स्टाॅक संपला,लाकडाची भट्टी पेटवली

Summer Health Tips: उन्हाळ्याच्या सुरुवातीला आरोग्याची घ्या नीट काळजी, या गोष्टी ठेवा सोबत; अन्यथा...

Weather Update: उन्हाच्या तडाख्याने होतेय अंगाची लाही-लाही; ठाण्यात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT