Karnataka Accident News Saam tv
देश विदेश

Karnataka Accident News: कर्नाटकात भरधाव ट्रकची कारला धडक; अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू, सोलापुरातील अख्ख कुटुंबच संपलं

कर्नाटकातील होस्पेट जवळील दोट्टीहाळ गावाजवळ भरधाव ट्रकने कारला धडक दिली.

विश्वभूषण लिमये

Solapur News: कर्नाटकातून अपघाताचं मोठं वृत्त हाती आलं आहे . कर्नाटकातील होस्पेट जवळील दोट्टीहाळ गावाजवळ भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृतांमध्ये चौघे सोलापुरातील आहे. दुर्देवी घटना रविवारी घडली. अपघातमध्ये पती-पत्नी आणि लहान मुलांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील होस्पेट जवळील दोट्टीहाळ या गावाजवळ ट्रकने कारला जोरदार धडक दिली. कर्नाटकात झालेल्या या अपघातात सोलापूरच्या लवंगी येथील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . या अपघातात सहा जण लवंगी तर दोघे इंडीचे दोघे आहेत. असे एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूरच्या लवंगी येथून बंगळुरूकडे आपल्या कारमधून निघालेले दोघे पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले असे चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील नंद्राळ गावच्या त्यांच्या दोन नातेवाईकांचाही मृत्यू झाला आहे.

या दुर्दैवी घटनेने मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेमुळे सोलापुरातील लवंगी आणि कर्नाटकातील नंद्राळ येथे एकच शांतता पसरली आहे.

कर्नाटकात झालेल्या अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली होती. या अपघातात राजप्पा, राघवेंद्र कांबळे, अक्षया, जयश्री, राखी आणि रश्मिका या ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर पोलीस मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत झालेले प्रवासी हे सोलापूरच्या लवंगी येथून बंगळुरूकडे निघाले होते. यावेळी हा भीषण अपघात झाला. या अपघातातील मृतांना कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्येकी २ लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

BJP Prabhari list: भाजपने भाकरी फिरवली! पक्षात मोठा फेरबदल; महाराष्ट्रातील ४ नेत्यांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

LPG eKYC : LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC केली नाही तर होणार आर्थिक नुकसान, जाणून घ्या नवा नियम

Shocking: डॉक्टरच्या निधनाने खळबळ, रुग्णालयातील बाथरुमध्ये आढळला मृतदेह

Diabetes drink: हे तीन घटक एकत्र उकळून प्या; डायबेटीस रूग्णांची वाढलेली साखर झटक्यात येईल कमी

SCROLL FOR NEXT