Kanpur Crime News Saam TV News
देश विदेश

Crime : ६ वर्षांच्या मुलीवर निर्घृण बलात्कार, आवाज दाबण्यासाठी तोंडात कोंबली पाने, नंतर दगडाने मारले

Kanpur Crime News : कानपूरमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या तरूणाने ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर दगडाने डोक्यावर मारले.

Namdeo Kumbhar

मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 6 वर्षीय बालिकेवर एका तरूणाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली. अत्याचार करताना मुलीने आरडाओरड केल्यामुळे नराधमाने तिच्या तोंडात पाने कोंबली अन् डोक्यावर दगडाने हल्ला केला. चिमुकली मृत झाल्याचे समजून नराधमाने घटनास्थळावर पळ काढला. कानपूरमध्ये ही भयंकर आणि शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना घडली.

कानपूरच्या घाटमपुर येथे मानवतेला काळिमा फासणारी आणि शरमेने खाली घालणारी ही भयंकर घटना घडली. जवाहर नगर मोहल्ल्यातील सय्यद बाबा मझारमागे ६ वर्षीय मुलीवर एका तरुणाने बलात्कार केला. मुलीने जोरात ओरडत प्रतिकार केला, पण नराधमाने तिच्या तोंडात जवळ असणारे पाने कोंबली. डोक्यावर दगडाने मारले. मुलगी रक्तबंबाळ झाल्यामुळे बेशुद्ध पडली. तिला मृत समजून नराधमाने धूम ठोकली. सध्या पीडित मुलीवर कानपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मुलगी सायंकाळी घराबाहेर ८ वर्षांच्या भावासोबत खेळत होती. त्यावेळी आरोपी (चिमुकली त्याला अंकल म्हणायची) तिथे पोहचला. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आरोपी तिला मझारमागे घेऊन गेला आणि हा घृणास्पद प्रकार केला. स्थानिक पोलिसांना मझारमागे रक्ताचे डाग दिसल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. मुलगी कुटुंबीयांना रात्री उशिरा रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. तातडीने तिला रुग्णालयात हलवले.

पोलिस तपासात समोर आले की, आरोपी हा कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या एका ट्यूबवेल ऑपरेटरचा भाचा आहे. तो नशेडी आहे. मुलीचे वडील सायकल दुरुस्तीचे काम करतात. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्याला पकडण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. डीसीपी साउथ दीपेंद्र चौधरी यांनी सांगितले की, बालिकेच्या बेपत्ता होण्याच्या माहितीनंतर ती मझारजवळ गंभीर अवस्थेत सापडली. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, तपास पूर्ण गतीने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT