Indira Gandhi Vs Rahul gandhi latest News Saam tv
देश विदेश

Kangana Ranaut : इंदिरा गांधी फक्त राहुल गांधींच्या आजी नव्हत्या...; कंगना रनौत पुन्हा चर्चेत

Kangana Ranaut Latest News : खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा चर्चेत आल्या आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबद्दल विधान केलं आहे. त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. त्या केवळ राहुल गांधी यांच्या आजी नाहीत, असं त्या म्हणाल्या.

Saam Tv

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्याबद्दल वक्तव्य करून खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा चर्चेत आल्या आहेत. इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील इमरजेंसी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच इंदिरा गांधींबद्दल त्यांनी मोठं विधान केलं आहे. काही लोक इंदिरा गांधी या राहुल गांधींच्या आजी आहेत, असे म्हणतात. पण मला तसं वाटत नाही. त्या फक्त राहुल गांधींच्या आजी नव्हत्या, तर या देशाच्या पंतप्रधान होत्या, असं रनौत म्हणाल्या.

कंगना काय म्हणाल्या?

कंगना रनौत (Kangana Ranaut) यांनी इंदिरा गांधीबद्दल वक्तव्य करून राहुल गांधींवर (Rahul Gandhi) हल्लाबोल केला. इंदिरा गांधी या प्रचंड लोकप्रिय होत्या. लोक फक्त मोदींनाच ईश्वराचा अवतार मानत नाहीत, तर इंदिरा गांधींनाही लोक चंडीचा अवतार मानायचे. इंदिरा गांधींकडून प्रेरणा घेत असल्याचंही कंगना म्हणाल्या.

'मी इतकी संकुचित नाही'

कंगना रनौत (Kangana Ranaut Latest Statement) यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी इंदिरा गांधींबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी इतकी संकुचित नाही. इंदिरा गांधी या देशाच्या तीन वेळा पंतप्रधान (Prime Minister) होत्या. त्या केवळ राहुल गांधी (Rahul Gandhi News) यांच्या आजी नाहीत, तर या देशाच्या पंतप्रधान होत्या. त्या आपल्या देशाचा इतिहास आहेत. देशासाठी समर्पित असाल तर, तुम्ही संपूर्ण देशाच्या असता. त्यांच्यावरही आपला तितकाच अधिकार आहे, असंही कंगना म्हणाल्या.

इंदिरा गांधींकडून प्रेरणा मिळते

इंदिरा गांधी हे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना प्रेम आणि द्वेष एकसारखाच मिळाला. मी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या जीवनापासूनही प्रेरणा घेते, असंही कंगना म्हणाल्या. मुलाखतीदरम्यान घराणेशाहीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी ही उत्तरे दिली. कंगना यांनी यावेळी फक्त इंदिरा गांधी आणि आणीबाणी (Emergency) यावर टीका न करता इंदिरा गांधींबद्दल अनेक सकारात्मक गोष्टीही सांगितल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : खोटं व्हायला शिका नाहीतर दुनिया देईल धोका, चाणक्यांनी सांगितली ५ गंभीर गुपितं

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

SCROLL FOR NEXT