Kala Chashma Dance Viral Video Saam TV
देश विदेश

Dance Video : 'काला चष्मा' गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स; नेटकरी झाले फिदा!

या व्हिडिओत 'काला चश्मा' या गाण्यावर महिला जबरदस्त डान्स करत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Dance Viral Video : सोशल मीडियावर कधी लहान मुलांचे डान्सचे व्हिडिओ समोर येतात, तर कधी मोठ्यांच्या डान्सचे व्हिडिओ धुमाकूळ घालतात. यामध्ये महिलांची संख्या देखील काही कमी नाहीये. डान्स करण्याची संधी मिळाली तर महिला ती सोडत नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media) काही महिलांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायलर झाला आहे. या व्हिडिओत 'काला चश्मा' या गाण्यावर महिला जबरदस्त डान्स करत आहे. (Kala Chashma Songs Women Viral Dance Video)

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने 'काला चश्मा' या गाण्यावर डान्स करत प्रेक्षकांना भूरळ घातली होती. त्यानंतर हे गाणं प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरलं होतं. तेव्हापासून अनेकजण या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर शेअर करत असतात. विशेष बाब म्हणजे, प्रत्येकवेळी या गाण्यावर थिरकणाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो.

आता काही महिलांनी देखील या गाण्यावर डान्स (Dance Video) करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही महिला काला चश्मा या गाण्यावर तुफान डान्स करताना दिसून येत आहे. यातील साडी घातलेल्या एका महिलेचा डान्स बघून अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. या महिलेने काला चश्मा गाण्यावर असे ठुमके मारले की, पाहणाऱ्यांना हा डान्स वारंवार पाहवसा वाटत आहे. (Women Viral Dance Video)

किटी पार्टीच्या या व्हिडिओमध्ये सर्व महिला डान्सचा आनंद लुटताना दिसत आहेत. हा व्हिडिओ videonation.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanjeevaram Saree Types: लग्न ते सणांसाठी परफेक्ट; कांजीवरम साडीचे 7 ट्रेंडी पॅटर्न नक्की करा ट्राय

Traditional Long Vati Mangalsutra Designs: पारंपारिक लांब वाटी मंगळसूत्राच्या हटके 5 डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर शोभून दिसतील

Mrunal Thakur: मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं सोज्वळ सौंदर्य; PHOTO पाहा

Maharashtra Live News Update: किरकोळ कारणातून शेजाऱ्याला रॉडने मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Marathi Education: मोठी बातमी! मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT