Kala Chashma Song Girls Dance Saam TV
देश विदेश

Dance Video : 'काला चश्मा'वर कोरियन पोरांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान Viral

'काला चश्मा' या गाण्याने नेटकऱ्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kala Chashma Song Girls Dance : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या 'काला चश्मा' या गाण्याने नेटकऱ्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) तर या गाण्याने खूपच धुमाकूळ घातलाय. लहानग्यापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच या गाण्यावर थिरकत आहे. काही दिवसांपूर्वी 'काला चश्मा' गाण्यावर ब्राझीलच्या तरुणींनी सुंदर डान्स केला होता. आता कोरियन तरुणींनी या गाण्यावर चांगलाच ठेका धरला आहे. (Kala Chashma Best Dance Videos)

सध्या सोशल मीडियावर कोरियन तरुणांचा डान्स (Dance Video) करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कोरियन तरुण काला चश्मा या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कोरियन डान्स ग्रुपमधील प्रत्येकजण 'काला चष्मा' गाण्याच्या सिग्नेचर डान्स मूव्ह आणि त्यांचे फ्यूजन व्हर्जन दोन्ही सादर करताना दिसत आहे. या तरुणांना गाण्याचे बोल नीट कळत नसले, तरी त्यांच्या उत्साहात कुठेही कमतरता दिसून येत नाहीये.

तरुणांचा हा ग्रुप डान्स करता-करता मस्ती सुद्धा करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, कसे कोरियन तरुण अगदी पारंपारिक कपडे परिधान करून या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ruhatenizo नामक इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीला काही तासातच अनेकांनी पसंती दर्शवली आहे. (Best Dance Videos)

देसी गाण्यावर विदेशी तरुणांना थिरकताना पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका नेटकऱ्याने लिहलं आहे की, मला देखील काला चश्मा हे गाणं खूपच पसंत आहे, पण मला माहित नव्हतं की हे गाणं विदेशातही इतकं फेमस होईल. दुसऱ्या एकाने लिहलं आहे की या तरुणांना गाण्याचे बोल जरी समजत नसले तरी त्यांनी केलेला डान्स हा खरचं अप्रतिम आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओला लाखो लोकांचा पसंती मिळाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT