Jharkhand Train Accident Saam Tv
देश विदेश

Jharkhand Train Accident: झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात, एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडलं; अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

Jamtara Train Accident: झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत.

Satish Kengar

Jharkhand Train Accident:

झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील जामतारा आणि विद्यासागर स्थानकादरम्यान एका एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती पसरली होती. ही माहिती मिळताच रेल्वेमधील प्रवाशी घाईघाईने रेल्वेतून बाहेर पडत असताना त्यांना दुसऱ्या रुळावरून भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. यामध्ये 12 प्रवासी जखमी झाले होते, असं सांगण्यात येत आहे. ज्यातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

असं असलं तरी मृतांची नेमकी आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. 'मदत आणि बचाव कार्यासाठी वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले असल्याचं जामतारा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

प्राथमिक माहितीच्या आधारे सांगितलं जात आहे की, बेंगळुरू-यशवंतपूर एक्स्प्रेस गाडी डाउन लाईनमध्ये थांबवण्यात आली होती. यावेळी अनेक प्रवासी रेल्वेमधून खाली उतरले होते. मात्र तेवढ्यात अप लाईनवर जाणाऱ्या ईएमयू रेल्वेने प्रवाशांना धडक दिली.

जामतारा एसडीएम अनंत कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रेल्वेला हेल्पलाइन क्रमांक जारी करण्याची विनंती करण्यात आली आहे. तपासानंतर घटनेचे कारण समजेल, असं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul Election: 'गोकुळ'चं राजकारण तापलं, भाजप अन् महाडिक गटाला डावलणं सत्ताधाऱ्यांच्या अंगलट?

परिणिती चोप्राचा नवरा राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update : जळगावात एटीएम मशीन चोरीला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Skin Care Summer: उन्हाच्या कडाक्यात चेहऱ्याला लावू नका या गोष्टी, डॉक्टरांनी दिल्या टिप्स

Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT