howrah mumbai mail Accident Saam TV
देश विदेश

Jharkhand Train Accident : मोठी बातमी! हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस रुळावरून घसरली; अनेक प्रवासी जखमी, बचावकार्य सुरू

howrah mumbai mail Express Accident : हावडा येथून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनचे डबे रुळावरून खाली घसरले आहेत. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे.

Satish Daud

झारखंडच्या चक्रधरपूरजवळ रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. हावडा येथून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनचे डबे रुळावरून खाली घसरले आहेत. या अपघातात आतापर्यंत ६ प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज मंगळवारी पहाटेच्या साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. रेल्वे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

अपघातग्रस्त ट्रेनमधून (Train Accident) प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. सध्या स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. घटनास्थळी प्रवाशांचा आरडाओरडा सुरू आहे. आतापर्यंत अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, हावडा येथून मुंबईच्या (Howrah Mumbai Mail Express) दिशेने ही एक्स्प्रेस येत होती. मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ट्रेन झारखंडच्या टाटानगर परिसरात आली. त्याचवेळी अचानक एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले.

अपघात इतका भीषण होता, ट्रेनचे डबे जवळच उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले. या अपघातात ६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या वृत्ताला रेल्वे अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात येत आहे.

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. या अपघाताची काही फोटो देखील समोर आले आहेत. दरम्यान, अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वास्तविक, ज्या ट्रॅकवरून एक्स्प्रेस जात होती त्याच्या शेजारी एक मालगाडी उभी होती. बोगी रुळावरून घसरली आणि मालगाडीला धडकली, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. टाटानगर 06572290324, चक्रधरपूर 06587 238072, राउरकेला 06612501072, 06612500244 आणि हावडा येथील प्रवाशांनी मदतीसाठी 9433357920, 03232673 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT