Moharram Procession: मोहरम मिरवणुकीत मोठी दुर्घटना! विजेच्या धक्क्याने ४ जणांचा मृत्यू; १० जण भाजले  Saamtv
देश विदेश

Moharram Procession: मोहरम मिरवणुकीत मोठी दुर्घटना! हायटेन्शन तारच्या संपर्कात आल्याने ४ जणांचा मृत्यू; १० जण भाजले

Bokaro News: दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी डीव्हीसी हॉस्पिटल बोकारो थर्मलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

Jharkhand News: झारखंडमधील बोकारो येथे मोहरमच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना समोर आली आहे. हाय टेन्शन लाईनच्या संपर्कात आल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण 13 जण गंभीररित्या भाजले आहेता. यामधील तर 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, झारखंडमधील बोकारो येथे मोहरमच्या मिरवणुकीत दुर्देवी घटना घडली. जिल्ह्यातील पीतेरवार ब्लॉकमधील खेतको गावात आज मोहरम निमित्त मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीदरम्यान सर्वजण मोहरममध्ये ताजिया घेऊन जात असताना 11000 व्होल्ट वायरच्या संपर्कात आले. ज्यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर १३ जण गंभीररित्या जळाले आहेत.

दुर्घटनेतील जखमींना प्राथमिक उपचारासाठी डीव्हीसी हॉस्पिटल बोकारो थर्मलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे प्राथमिक उपचारानंतर गंभीर व्यक्तींना बोकारो सामान्य रुग्णालयात चांगल्या उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी झाली आहे. यासोबतच डीव्हीसी हॉस्पिटलमध्ये जखमींच्या नातेवाईकांनी गर्दी झाली आहे. प्रशासनाला माहिती मिळताच पेटरवार पोलीस ठाणे आणि बोकारो थर्मल पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT