drowned  saam tv
देश विदेश

Jharkhand News : सहा मित्रांचा धरणात बुडून मृत्यू, कॉलेजला दांडी मारुन गेले होते फिरायला

Drown News : सर्वजण १२ वीच्या वर्गात शिकत होते. शाळा बंक करुन हे सर्व मित्र पिकनिकला गेले होते.

प्रविण वाकचौरे

Jharkhand News :

पिकनिकला गेलेल्या ६ मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. झारखंडच्या हजारीबाग जिह्यातील लोटवा धरणात मंगळवारी ही घटना घडली आहे. सर्वजण १२ वीच्या वर्गात शिकत होते. शाळा बंक करुन हे सर्व मित्र फिरायला गेले होते.

रजनीश पांडे, सुमित कुमार, मयंक सिंग, प्रवीण गोप, इशान सिंग आणि शिवसागर सिंग अशी मृतांची नावे आहेत. सर्वांचे वय १७ ते १८ वर्ष असल्याची माहिती मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणावर फिरायलेल्या गेलेल्या तरुणांना पोहण्याचा मोह आवरला नाही. सर्वात आधी दोन विद्यार्थी धरणात उतरले आणि थोड्याच वेळात बुडू लागले. हे पाहून इतर मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी धरणात उड्या मारल्या. मात्र काही मिनिटातच सहा मित्र धरणात बुडाले, तर एकाला वाचवण्यात यश आले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या दाव्यानुसार, विद्यार्थी मंगळवारी सकाळी गणवेशात घरातून बाहेर पडले. परंतु वर्गात न जाता सर्वजण धरणावर फिरायला गेले. त्या दिवशी वर्गात जवळापास १६-१७ जण अनुपस्थित होते. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. हजारीबाग जिल्ह्यातील लोटवा धरणात सहा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दु:खद बातमीने मन दुखावले आहे.दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT