Crime News Saam Tv News
देश विदेश

Crime News: बहिणीच्या अंत्यसंस्काराला गेला आणि भावोजीला जळत्या चितेवर फेकला, मेहुण्याचा धक्कादायक प्रताप

Man Burned Alive: झारखंडच्या गुमला येथून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. कोरंबी गावात एका ६० वर्षीय वृ्द्धाला जळत्या चितेत फेकून जिवंत जाळण्यात आलंय.

Bhagyashree Kamble

झारखंडच्या गुमला येथून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. कोरंबी गावात एका ६० वर्षीय वृ्द्धाला जळत्या चितेत फेकून जिवंत जाळण्यात आलंय. हे मनाला हेलावून टाकणारं कृत्य वृद्धेच्या नातेवाईकांनीच केलं. बुधेश्वर उरांव असं मृत वृद्धेचं नाव असून, त्यांच्या नातेवाईकांनीच बेदम मारहाण करून नंतर त्यांना जळत्या चितेत फेकून दिलं. वृद्ध व्यक्तीचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला असून, या घटनेनंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

या ह्रदयद्रावक घटनेबद्दल मृत वृद्ध यांचा मुलगा संदीप उरांव सांगतात, 'माझी आई मांगरी उरांव यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनास पाठवण्यात आलं. नंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. अंत्यसंस्कार होत असताना, बुधेश्वर उरांव, मामा झडी उरांव आणि त्यांचा मुलगा करमपाल उरांव यांच्यात बाचाबाची झाली.

भांडणाचं रुपांतर मारहाणीत झालं. झडी उरांव आणि करमपाल उरांव यांनी मिळून बुधेश्वर उरांव यांना मारहाण केली. नंतर त्यांच्या बायकोच्या जळत्या चितेवर फेकून दिलं. बराच वेळ होऊनही वडील घरी न परतल्याने त्यांचा शोधकार्य सुरु करण्यात आला. ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळ गाठले. जिथे त्यांना बुधेश्वर उरांव यांचा मृतदेह जळत असल्याचं दिसून आलं. यानंतर बुधेश्वर उरांव यांचा मुलगा आणि ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.

अंधश्रद्धा की जमिनीचा वाद?

या घटनेसंदर्भात पोलीस उपअधीक्षक सुरेश प्रसाद म्हणाले, ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. मारेकऱ्यांना अटक करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासात हा वाद जमिनीच्या वादातून झाला असल्याचं समजते. तरी देखील प्रत्येक पैलूचा सखोल तपास सुरू आहे. या ह्रदयद्रावक घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी असे आश्वासन पोलिसांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT