Exam cancellation saam tv
देश विदेश

Exam cancellation: तब्बल ४४ भरती परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; JPSC, JSSC सह कोणत्या स्पर्धा परीक्षा रद्द?

44 recruitment exams cancelled: झारखंड सरकारने कथित अनियमिततेमुळे 44 भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. JPSC, JSSC आणि TDPLशी संबंधित परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. काही परीक्षा स्थगित असून जुन्या परीक्षांची सीआयडी चौकशीही केली जाणार आहे, अशी माहिती सरकारने दिली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या सततच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने मंगळवारी रात्री मोठा निर्णय घेतलाय. कथित अनियमितता आढळल्यामुळे रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी सरकारने जाहीर केलीये. याबाबत सरकारकडून एकूण आठ स्वतंत्र अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. 2014 नंतर झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि आउटसोर्सिंग एजन्सी टीडीपीएल (TSR Data Processing Pvt Ltd) यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षांचा यामध्ये समावेश आहे.

रद्द करण्यात आलेल्या परीक्षा

  • झारखंडमधील विद्यापीठांमध्ये शिक्षकेतर पदांची भरती - जाहिरात क्र. 09/2025

  • सहायक संचालक / वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅकलॉग) भरती - जाहिरात क्र. 10/2025

  • सहायक संचालक / वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (नियमित) भरती - जाहिरात क्र. 11/2025

  • औषध निरीक्षक भरती - जाहिरात क्र. 12/2025

  • सरकारी इंजिनीअरिंग कॉलेजमधील सहायक प्राध्यापक (बॅकलॉग) भरती - जाहिरात क्र. 02/2026

  • सरकारी पॉलिटेक्निक / महिला पॉलिटेक्निकमधील व्याख्याता (बॅकलॉग) भरती - जाहिरात क्र. 03/2026

  • सरकारी पॉलिटेक्निक / महिला पॉलिटेक्निकमधील व्याख्याता (नियमित) भरती - जाहिरात क्र. 04/2026

  • मेडिकल कॉलेजमधील सुपर स्पेशालिस्ट विभागातील सहायक प्राध्यापक भरती - जाहिरात क्र. 07/2026

रद्द करण्यात आलेल्या परीक्षा

(JPSC मार्फत घेण्यात आलेल्या आणि TDPL एजन्सीने प्रक्रिया केलेल्या इतर परीक्षा)

  • सिव्हिल जज (ज्युनिअर डिव्हिजन) भरती - जाहिरात क्र. 22/2023

  • सहायक वन संरक्षक भरती - जाहिरात क्र. 03/2024

  • वन क्षेत्र अधिकारी भरती - जाहिरात क्र. 04/2024

  • सहायक सरकारी वकील (बॅकलॉग) भरती - जाहिरात क्र. 05/2025

  • सहायक सरकारी वकील (नियमित) भरती - जाहिरात क्र. 06/2025

  • झारखंड संयुक्त नागरी सेवा परीक्षा-2025 - जाहिरात क्र. 01/2026

  • झारखंड संयुक्त नागरी सेवा परीक्षा (बॅकलॉग)-2025 - जाहिरात क्र. 05/2026

  • झारखंड संयुक्त नागरी सेवा परीक्षा (बॅकलॉग)-2023 - जाहिरात क्र. 06/2026

रद्द करण्यात आलेल्या परीक्षा

(TDPL मार्फत प्रक्रिया केलेल्या इतर JPSC परीक्षा)

  • अन्न सुरक्षा अधिकारी भरती - जाहिरात क्र. 18/2023

  • बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) भरती - जाहिरात क्र. 21/2023

  • संयुक्त नागरी सेवा परीक्षा-2023 - जाहिरात क्र. 01/2024

रद्द करण्यात आलेल्या परीक्षा

(TDPL/इतर वादग्रस्त एजन्सींच्या सहभागामुळे रद्द)

  • सहावी मर्यादित उपजिल्हाधिकारी भरती- जाहिरात क्र. 11/2018

  • झारखंड पात्रता परीक्षा (JET) 2024 - जाहिरात क्र. 08/2025

रद्द करण्यात आलेली परीक्षा

(JSSC परीक्षा)

JSSC सामान्य पदवीधर पात्रता संयुक्त स्पर्धा परीक्षा (CGL) - जाहिरात क्र. 10/2023

स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा

फूड अॅनालिस्ट (05/2024), उपसंचालक अभियोजन (03/2025), प्रोजेक्ट मॅनेजर (04/2025), कारखाना निरीक्षक (01/2025), बॉयलर निरीक्षक (02/2025) आणि संचालक (07/2025) या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. या परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित एजन्सीच्या कामाची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आलीये.

सीआयडी चौकशीच्या कक्षेत जुन्या परीक्षा

अधिसूचना क्रमांक 5406 नुसार 5वी नागरी सेवा परीक्षा, 2016 ची नागरी सेवा परीक्षा, 2021 ची नागरी सेवा परीक्षा, सहायक अभियंता, सिव्हिल जज यांसह एकूण 17 जुन्या परीक्षांचा सीआयडी चौकशीच्या कक्षेत समावेश करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! तिसऱ्या अपत्यासाठीही १ वर्षाची प्रसूती रजा; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Maharashtra News Live Update: दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात

हॉटेलच्या रूममधून मुलीच्या भयंकर किंकाळ्या; दार उघडताच समोर हादरवणारं दृश्य, प्रियकर रेल्वे कर्मचाऱ्याचे भयानक कृत्य

Haunted Fort : किंकाळ्या अन् बरंच काही; महाराष्ट्रातील 'हे' ५ किल्ले दिवसा सुंदर, पण रात्री रहस्यमय!

Maharashtra politics : सत्ताधारी आमदारावर गुन्हा दाखल, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT