Jharkhand Former CM Hemant Soren Yandex
देश विदेश

Hemant Soren: वाढलेली दाढी, गळ्यात मफलर; अटकेनंतर हेमंत सोरेन पहिल्यांदाच तुरूंगाबाहेर, नवा फोटो पाहिलात का?

Hemant Soren First Look After Arrest: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन अटकेनंतर तुरूंगाबाहेर आहेत. ते नवीन अंदाजात दिसत आहे.

Rohini Gudaghe

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand Former CM Hemant Soren) यांचा नवा फोटो समोर आला आहे. वाढलेली दाढी आणि गळ्यात मफलर असलेला त्यांचा फोटो X अकाउंटवरून समोर आला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्यांच्या काकांच्या श्राद्धविधीसाठी रामगडच्या नेमरा गावात जात आहे. त्यांना कोर्टाने आज त्यांच्या काकांच्या श्राद्धविधीसाठी एका दिवसाचा जामीन मंजूर केला होता. श्राद्धविधी संपल्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा तुरूंगात होणार आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे वेगळ्या अंदाजात दिसले आहेत. त्यांचा नवा फोटो समोर आलाय. ते त्यांचे वडील शिबू सोरेन यांच्यासारखे दिसत आहे. हेमंत सोरेन यांनी घटनास्थळी (Hemant Soren First Look After Arrest) पोहोचून आई-वडिलांचे आशीर्वाद घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा नवा लुक पाहुन आई भावूक झाल्याची माहिती मिळत आहेत.

झारखंड हायकोर्टाने हेमंत सोरेन यांना या कार्यक्रमासाठी हजर राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ते तुरूंगाबाहेर येऊन या श्राद्धविधीमध्ये सहभागी झाले आहेत. श्राद्धविधी संपल्यानंतर सोरेन पुन्हा (Hemant Soren) बिरसा मुंडा सेंट्रल जेलमध्ये जाणार आहेत. हेमंत सोरेन यांनी एक दिवसाचा तात्पुरता जामीन मागितला होता. त्याला उच्च न्यायालयाने परवानगी दिली नाही.

न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत हजर राहण्याची मुभा दिली (Jharkhand Politics) आहे. त्यांना या कालावधीत मीडियापासून दूर राहण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. रांचीतील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने ३१ जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली होती. अटकेच्या काही तासांआधी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. ते आज एका दिवसासाठी तुरूंगातुन बाहेर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गृहिणी ते खासदार, आता उपमुख्यमंत्री! सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, VIDEO

Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोण आहेत?

मी सुनेत्रा अजित पवार....; महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

Hair Fall Control: केस होतील मुलायम अन् मजबूत; रोज फॉलो करा ही १ ट्रिक

SCROLL FOR NEXT