Jharkhand Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : संतापजनक! "तुझी बायको चेटकीण" गावकऱ्यांनी कुटुंबाला जाळलं; दोन महिन्याच्या बाळासह तिघांचा मृत्यू

Jharkhand Crime News : झारखंडमध्ये अंधश्रद्धेतून एकाच कुटुंबातील तिघांना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • अंधश्रद्धेमुळे जमावाने कुटुंबावर पेट्रोल टाकून जाळले

  • दोन महिन्यांच्या बाळासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

  • जखमी पतीने पोलिसांत धाव घेत घटना उघडकीस आणली

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल; आरोपींचा शोध सुरू

पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील कुमारडुंगी पोलीस स्टेशन परिसरात अंधश्रद्धेची एक भयानक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे या घरात चेटकिणीचा वास्तव असल्याच्या संशयातून या कुटुंबाला जाळलं असल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेत एका ३२ वर्षीय महिलेला आणि तिच्या दोन महिन्याच्या बाळाचा, तसेच घरातील एका सदस्याचा जळून मृत्यू झाला आहे. या भयावह घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडमधील कुमारडुंगी पोलिस स्टेशन हद्दीतील कलैया गावात घडली आहे. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ४० वर्षीय कोल्हान सिंकू, त्याची दुसरी पत्नी ३२ वर्षीय ज्योती सिंकू, त्याचा दोन वर्षांचा मुलगा आणि त्यांच्या दोन महिन्यांच्या बाळासह घरी झोपला होता. तेव्हा त्याच गावातील त्याची चुलत बहीण रशिका बिरुवा हिने बाहेरून हाक मारली. आवाज ऐकून कोल्हाण त्याची पत्नी ज्योतीसह बाहेर आला. त्याच वेळी त्याची पहिली पत्नी जानी सिंकू देखील बाहेर आली.

यादरम्यान कोल्हानच्या अंगणात गावकरी जमले होते. त्यांचं असं म्हणणं होत की, कोल्हानची दुसरी पत्नी चेटकीण आहे. या गोंधळानंतर कोल्हाणने जमावाला शांत करत पंचायत बैठकीत निर्णय घेतला जाईल असे सांगितले. मात्र अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या जमावाने ऐकले नाही. याच जमावातील एकाने गॅलन पेट्रोल काढून कुटुंबावर ओतले. त्यानंतर काडी पेटवून कुटुंबाला जाळण्यात आले. आग पेटताच सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. आगीच्या ज्वाळांनी वेढलेला कोल्हान सिंकू पळून जाण्यात यशस्वी झाला. वाटेत त्याने आपले जळलेले कपडे काढून टाकले आणि कुमारडुंगी पोलिस स्टेशन गाठलं.

घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना सांगत तक्रार दाखल केली. कोल्हानच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. तसेच कोल्हानच्या म्हणण्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update : पगारातून PF कापलं जातं, पण अकाउंटमध्ये पैसे जात नाही? सर्वात आधी ही एक गोष्ट करा!

बिल्डर घराचं पझेशन देण्यास टाळाटाळ करतोय? RERAचा नियम जाणून घ्या; व्याजासह मिळणार संपूर्ण पैसा परत

Maharashtra News Live Update: भुसावळमध्ये संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

Celebrity Ganpati: सुबोध भावे ते सोनाली कुलकर्णी; मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचं थाटात स्वागत

पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

SCROLL FOR NEXT