Jharkhand Case saam tv
देश विदेश

Teacher Abused Girl Students: आयएएस बनवण्याचं स्वप्न दाखवून शिक्षकाचं विद्यार्थिनींसोबत भयंकर कृत्य; व्हिडिओ बनवून वारंवार...

Teacher Molested Girl Students: तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अल्पवयीन मुलींवर अत्याचार करतानाचे त्यांचे अश्लील व्हिडिओ देखील बनवले.

Chandrakant Jagtap

Jharkhand Case News: शिक्षकाला देवाचा दर्जा दिला जातो पण झारखंडमधील एका शिक्षकाने या पेशाला काळिमा आणली आहे. झारखंडमधील रांची येथे यूपीएससी तयारी करणाऱ्या कोचिंग संचालकाने दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या कोचिंग क्लासच्या संचालकाने अल्पवयीन मुलींना IAS बनवण्याचे स्वप्न दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अल्पवयीन मुलींवर अत्याचार करतानाचे त्यांचे अश्लील व्हिडिओ देखील बनवले. यानंतर त्यांना धमकावत वारंवरा त्याने मुलींवर अत्याचार केले. पशुपती नाथ असे आरोपीचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

झारखंडमधील रांची येथे पशुपती नाथ नावाची व्यक्ती यूपीएससी कोचिंग चालवत होती. पशुपती नाथ मूळचा बिहारचा असून तो रांची येथील एका घरात कोचिंग क्लास घेत होता. त्याच्याकडे दोन अल्पवयीन विद्यार्थिनी अभ्यासासाठी येत होत्या. यातील एका पीडित विद्यार्थिनीने एकदा कोचिंगला जाण्यास नकार दिला.

यानंतर तिच्या वडिलांना तिला त्याचे कारण विचारले. मुलीने कारण सांगितले तेव्हा तिच्या वडिलांना धक्काच बसला. तिने सांगितले की, पशुपतीनाथ अभ्यासाच्या बहाण्याने तिच्या नाजूक अवयवांना हाताने स्पर्श करतो. याशिवाय तो दोन्ही मुलींशी जबरदस्तीने संबंध ठेवतो. आरोपी पशुपतीनाथने त्यांचे अश्लील व्हिडिओही बनवल्याचे तिने सांगितले. (Crime News)

ग्रामस्थांनी आरोपीला दिला चोप

आरोपी शिक्षक मुलींना व्हॉट्सअॅपवर मेसेजवर शिवीगाळ करत होता. अनेकदा त्यांचे लैंगिक शोषण देखील त्याने केले होते. एवढेच नाही तर मुलींना ब्लॅकमेल करून आईचे दागिने घरून आणण्यास सांगत होता. परंतु मुलीने केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी कोचिंग क्लास गाठून शिक्षकाला जोरदार मारहाण केली.

सोमवारी रात्री गावकऱ्यांनी आरोपी पशुपतीनाथला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा कायदा अल्पवयीनांच्या लैंगिक छळ आणि लैंगिक शोषणासंबंधित आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT