संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची प्रत सोरेन यांनी रांचीच्या एसएससीटी-एएससी पोलिस स्टेशनला पाठवली आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यां आरोप केला की, ते आदिवासी समाजातून येतात आणि दिल्लीत ईडीने त्यांचा छळ केला आहे. रांची पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 'झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडी अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार पाठवली आहे. धुर्वा पोलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली आहे.' (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावरून झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे. X वर पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, ''सरकारचे चोरांना संरक्षण देणारी आणखी एक कृती. चोरांची सत्ता केवळ गल्लीतच नाही तर, रस्त्यांवरही आहे. गेल्या 2 महिन्यात चोरट्यांनी घरे व दुकाने फोडून सुमारे 70 लाख रुपयांची अफाट सार्वजनिक मालमत्ता हस्तगत केली.'' (Latest Marathi News)
ते पुढे म्हणाले, ;;राज्य पुरस्कृत चोर, दरोडे यामुळे संपूर्ण राज्यात असुरक्षिततेचे वातावरण आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन अशा चोर आणि गुन्हेगारांसाठी आदर्श बनण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. अखेर चोर, दरोडेखोरांची मनमानी किती दिवस चालणार? किती दिवस जनतेला भीतीच्या छायेखाली जगावे लागणार?''
दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची त्यांच्या निवासस्थानी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्यकारी अध्यक्ष असलेले सोरेन (48) यांची याआधी 20 जानेवारी रोजी याच प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्या दिवशी चौकशी पूर्ण होऊ शकली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्या दिवशी सोरेन यांची सात तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.