UP Crime news Saam Tv
देश विदेश

UP Crime news: तरुणीला घरातून शेतात पळवून नेलं; अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल, संतापजनक घटनेनं जौनपूर हादरलं

Crime News: मुलीच्या कुटुंबीयांना पाहून नराधम तरुणांनी त्यांना शिवीगाळ करत तेथून पळ काढला.

साम टिव्ही ब्युरो

Jaunpur Crime News: उत्तरप्रदेश जौनपूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. रात्रीच्यावेळी एका तरुणीला तिच्या घरातून काही तरुणांनी पळवून नेले. तरुणीला शेतात आणून त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. नराधमांनी या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल केला आहे. (Latest Marathi News)

सदर घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जौनपूमध्ये तरुणी आपल्या कुटुंबासह घरात झोपली होती. यावेळी ६ टवाळ मुलांनी तिला शेतात पळवून आणले. तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करत त्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला. यावेळी तरुणीने स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी मोठा आरडाओरडा केला.

आपली सुटका व्हावी म्हणून तिचा आक्रोश सुरू असताना कुटुंबीयांना तिची हाक ऐकू आली. आपली मुलगी घरात नाही आणि हा तिचाच आवाज आहे हे कळताच त्यांच्या काळजात धडकी भरली. त्यांनी तातडीने शेताच्या दिशेने धाव घेतली. मुलीच्या कुटुंबीयांना पाहून नराधम तरुणांनी त्यांना शिवीगाळ करत तेथून पळ काढला. आपली बदनामी होईल त्यामुळे याबाबत कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.

काही दिवसांत तरुणांनी तो व्हिडीओ सोशल मीडिवर व्हायरल केला. यामुळे पीडितेच्या आईने आशिष, विकी, गोरे, प्रमोद, पप्पू आणि शेषमणी यांच्या विरोधात कोतवाली येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या सर्व आरोपींना गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण होणार? आरक्षण जाहीर, वाचा

Maharashtra Live News Update : किशोरी पेडणेकरांकडून महापौर सोडतीवर आक्षेप

BMC Mayor: मुंबई महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?

Mayor Reservation : तुमचा महापौर कोण? मुंबई, पुण्यासह २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर, सर्व यादी एका क्लिकवर

Single Strip Blouse Designs: ब्लाऊजची फक्त एकच पट्टी, साडीवर उठून दिसण्यासाठी ब्लाऊजचे 5 स्टायलिश पॅटर्न

SCROLL FOR NEXT