Success Story Saam TV
देश विदेश

Success Story: ५ दिवसांत ५ सरकारी नोकऱ्यांची ऑफर; भन्नाट यशासाठी तरूणीनं अवलंबला 'हा' कठीण मार्ग

Jamui Girl Tinu Singh Success Story: नोकरी मिळवण्यासाठी तिने मोठी मेहनत घेतली. शेवटी तिच्या मेहनीला यश मिळाले आणि तिने एकाचवेळी ५ सरकारी परिक्षांत मोठी झेप घेतली. २२ ते २६ डिसेंबर या पाच दिवसांत तिला ५ सरकारी नोकऱ्यांसाठी ऑफर आल्यात.

Ruchika Jadhav

Bihar News:

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी मेहनत घेत असतो. अनेक विद्यार्थी नोकरी करत स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतात. प्रचंड मेहनत करून घवघवीत यश मिळवतात. मात्र यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्याआधी अनेकांना अपयशाचाही सामना करावा लागतो. अशात एकाचवेळी जर तुम्हाला ५ ठिकाणी सरकारी नोकरीची ऑफर आली तर? अनेक व्यक्तींनी एकाच वेळी ५ सरकारी नोकऱ्यांची ऑफर मिळले असं स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र हे स्वप्न नाहीतर सत्य आहे. बिहारच्या जुमई येथे राहणाऱ्या टीनू सिंहने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. तिने फार मेहनतीने आणि संपूर्ण मन एकाग्र करून अभ्यास केला. तिने केलेल्या मेहनतीचं चीज झालं असून टिनूला एकाच वेळी ५ ठिकाणाहून सरकारी नोकरीसाठी कॉल आलेत. या ऑफर बाबत तिने स्वत: सर्व माहिती दिलीये.

कोणती ऑफर स्विरली

पाच ठिकाणाहून सरकारी नोकरीसाठी ऑफर आल्यावर तिने नेमकी कोणती ऑफर स्विरली हे जाणून घेण्याआधी टीनूच्या स्ट्रगलबद्दल जाणून घेऊ. टीनू सिंहचे वडिल सीआपरीएफमध्ये सब इंस्पेक्टर आहेत. तर तिच्या आईने (एमए) मधून शिक्षण पूर्ण केलं आहे. काही काळ त्यांनी देखील शिक्षिकेची नोकरी केली.

पाच दिवसांत तिला ५ सरकारी नोकऱ्या

आपल्या मुलीला सरकारी नोकरी मिळावी असं तिच्या आईबाबांचं स्वप्न होतं. नोकरी मिळवण्यासाठी तिने मोठी मेहनत घेतली. शेवटी तिच्या मेहनीला यश मिळाले आणि तिने एकाचवेळी ५ सरकारी परिक्षांत मोठी झेप घेतली. २२ ते २६ डिसेंबर या पाच दिवसांत तिला ५ सरकारी नोकऱ्यांसाठी ऑफर आल्यात.

यूपीएससीची परीक्षा पास करण्याचा निर्णय

कंप्यूटर डाटा ऑपरेटर, सहाय्यक शाखा अधिकारी या दोन ठिकाणच्या परिक्षा तिने पास केल्या. तसेच इतर तीन परीक्षा BPSC शिक्षक भरतीशी संबंधित होत्या. या सर्वांतून टीनूने अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. तिने सहाय्यक शाखा अधिकारी पदाचा स्विकार केला. मोठी झेप घेऊनही टीनूने इथून पुढे अभ्यास सुरू ठेवून यूपीएससीची परीक्षा पास करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

Tmkoc Show: जेठालालचं भांडण पेटलं, निर्मात्याची पकडली कॉलर नंतर दिली शो सोडण्याची धमकी

BJP-Congress Rada : काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, जोरदार हाणामारी अन् खुर्च्या फेकल्या

IPL 2025 Mega Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT