Pahalgam Terror Attack Saam Tv
देश विदेश

Pahalgam Video: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा VIDEO

A terrorist attack in Pahalgam: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामजवळच्या बैसरन व्हॅलीत मंगळवारी दुपारी घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

Bhagyashree Kamble

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी बैसरन व्हॅली परिसरात दहशतवादी हल्ला झाला. सुखरूप पोहोचलेले प्रत्यक्षदर्शींनी या हत्येचा थरार सांगितला. अशातच दगशतवाद्यांनी कशाप्रकारे भारतीय पर्यटकांना घेरून गोळ्या झाडल्या, रक्ताचे पाट कशा पद्धतीने वाहिले, हे सगळं या व्हिडिओमध्ये कैद झालं आहे.

काश्मीर खोऱ्यातील बैसरन घाटात वेगवेगळ्या भागातून पर्यटक निसर्ग पाहायला गेले होते. पर्यटक मुक्तपणे फिरत असताना अचानक द रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांनी बैसरन घाटावरील पर्यटकांना लक्ष करत घेरलं. तसेच पुरूषांना धर्म विचारत त्यांच्यावर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या या नव्या व्हिडिओमध्ये पर्यटक घाबरलेले पाहायला मिळत असून, जीव मुठीत घेऊन आरडाओरडा करताना दिसून येत आहेत. तसेच दहशतवादी देखील पर्यटकांना घेरून हल्ला करत आहेत. पर्यटकांवर कशापद्धतीने दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. हे व्हिडिओद्वारे समोर आले आहे.

व्हिडिओमध्ये काही पर्यटक जीव वाचवण्यासाठी धाव घेत आहेत. डोंगराळ भाग असल्यामुळे पर्यटकांना धाव घेतानाही अडचण येत होती. काही पर्यटकांना गंभीर इजा देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News : एसीचा स्फोट आणि होत्याच नव्हतं झालं; सोलापुरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Online Meeting : शिक्षण विभागाची ऑनलाइन मीटिंग, अचानक अश्लील व्हिडिओ शेअर; शिक्षिकेवर कारवाई

Maharashtra Live News Update: नांदेडच्या किनवट तालुक्यात पूर परिस्थिती

Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

NCERT Partition Module : भारत-पाकिस्तान फाळणीचं नवं मॉड्यूल; काँग्रेस जबाबदार, नेहरूंच्या भाषणाचाही दाखला

SCROLL FOR NEXT