Jammu-Kashmir Latest News File Photo SAAM TV
देश विदेश

Firing in Jammu Kashmir : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; ३ नागरिकांचा मृत्यू, ७ जखमी

जम्मू-काश्मीरमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरीच्या डांगरी गावात गोळीबाराची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Firing in Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरीच्या डांगरी गावात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ लोक जखमी झाले आहेत. या घटनेने जम्मू-काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या डांगरी गावात नागरिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात ८ जण जखमी झाले. त्यामुळे जखमींना राजौरीच्या मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल केले. या जखमीपैकी २ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर परिसरात नाकाबंदी लावली आहे.

राजौरीच्या डांगरी गावात ५० मीटर परिसरात तीन वेगळ्या-वेगळ्या घरांवर गोळीबार केला. जखमींवर जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजौरीच्या डांगरी गावात ५० मीटर परिसरात तीन वेगळ्या-वेगळ्या घरांवर गोळीबार केला. जखमींवर जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजौरीते रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. महमूद यांनी सांगितले की, राजौरीच्या डांगरी गावात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांवर उपचार सुरू आहेत. पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना लागलेल्या गोळ्या जमा केल्या आहेत.'

दरम्यान, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांवर गोळीबारांची घटना घडल्याने परिसरात भीती पसरली आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नाकाबंदी लावून दहशतवाद्यांचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT