Jammu Kashmir Encounter Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Satish Kengar

जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरच्या कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. रविवारी सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. अद्यापही घुसखोरीविरोधी कारवाई सुरूच असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत माहिती देताना श्रीनगर येथील सैन्याच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, ''केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. त्यांच्याकडून शस्त्रे आणि इतर युद्धसामुग्रीही जप्त करण्यात आली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.''

अलीकडेच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेदरम्यान ही दहशतवादी हल्ले झाले. याचा महिन्यात म्हणजेच 8 जुलै 2024 रोजी कठुआच्या बडनोटा भागात सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटाने गस्तीवर असलेल्या सैन्यावर हल्ला केला होता. ज्यामध्ये पाच जवान शहीद झाले होते आणि आठ जवान जखमी झाले होते.

यातच जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील भारतीय सैन्याच्या तळावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. सैन्याच्या चौकीवर तैनात असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता, ज्यात एक जवान जखमी झाला होता.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग म्हणून सुरक्षा दल सातत्याने कारवाई करत आहेत. या अंतर्गत जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दोन ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 6 दहशतवादी मारले गेले होते. या चकमकीत दोन जवानही शहीद झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT