Jammu Kashmir Kupwara Encounter Saam TV
देश विदेश

Kupwara Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुपवाड्यात पुन्हा चकमक; सुरक्षा दलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू

Jammu Kashmir Encounter: एलओसीच्या जुमागुंड भागात शुक्रवारी सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ५ दहशतवादी मारले गेले आहेत.

Satish Daud

Jammu Kashmir Kupwara Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एलओसीच्या जुमागुंड भागात शुक्रवारी सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ५ दहशतवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांचे ऑपरेशन अजूनही सुरू परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरू आहे. (Latest Marathi News)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. कुपवाडा (Jammu Kashmir) जिल्ह्यातील जुमागुंड भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहिम सुरू केली.

दरम्यान, शोधमोहिम राबवताना काही दहशतवाद्यांनी (Terrorists Attacks) पोलिस आणि सुरक्षा रक्षक जवानांवर अचानक हल्ला करत गोळीबार सुरू केला. यावेळी जवानांनी देखील दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत ५ दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, मंगळवारी सुद्धा सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं होतं. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. ऑपरेशन डोगा अंतर्गत मंगळवारी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.

ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवणे सुरू असून त्यांच्याशी संबधित असलेल्या दहशतवादी संघटनेची माहिती मिळवणे सुरू आहे. दोघेही पाकिस्तानी असल्याचा संशय आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT