Jammu-kashmir Attack 
देश विदेश

Jammu-kashmir Attack: संडे बाजारात ग्रेनेड हल्ला, १० जण जखमी, दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू

Grenade Attack In Srinagar : श्रीनगरमधील संडे बाजारात ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना घडली. यात १० जण जखमी झालेत.

Bharat Jadhav

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील बाजारात ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना घडलीय. मुख्य श्रीनगरमधील टीआरसी कार्यालयाजवळील रविवारच्या बाजारात हा हल्ला झाला. श्रीनगरमधील टीआरसी कार्यालयाजवळील संडे बाजारात हा हल्ला झाला. या घटनेत १० जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान एका दिवसाआधी खानयारमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची घटना घडली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकाला यश आलं होतं.

रेडिओ काश्मीर क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलावरून संडे बाजारात हा ग्रेनेड फेकण्यात आला. बाजारातील दुकानदार आणि खरेदी करणारे ग्राहक या हल्ल्यात जखमी झालेत. ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालेल्या १० जणांची नावे मिसबा, अजान कालू, हबीबुल्ला रादर, अल्ताफ अहमद सीर, फैजल अहमद, उर फारुक, फैजान मुश्ताक, जाहिद, गुलाम मुहम्मद सोफी आणि सुमैया जान अशी आहेत. दरम्यान शनिवारी ठिकाणी चकमकीच्या घटना घडल्या होत्या.

यात सुरक्षा दलांने पाकिस्तानच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. पहिली चकमक श्रीनगरमध्ये, तर दुसरी चकमकीची घटना अनंतनागमध्ये झाली. यामध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानी कमांडर आणि इतर दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

या मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम चालू असून यातील एकाची ओळख पटलीय. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, उस्मान असं एका दहशतवाद्याचं नाव आहे. एलईटी कमांडर काश्मीर खोऱ्यात एक दशकापासून सक्रिय होता. इन्स्पेक्टर मसरूर वाणी यांच्या हत्येतही त्याचा सहभाग होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मसरूर वाणी यांची इदगाह मैदानावर क्रिकेट खेळत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उस्मान हा एका वर्षापासून सक्रीय होता. अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. तो ठार होणं हे त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. उस्मान हा सर्वात वरिष्ठ पाकिस्तानी लष्कर कमांडर होता. श्रीनगरमधील चकमकीत सुरक्षा दलाचे जवान जखमी झालेत. या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी आतल्या शहरातील दाट लोकवस्तीच्या खानयार भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील पांगरा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

Dr Ambedkar Favourite Cafe: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईतला आवडता कॅफे कोणता होता?

मुंबईत १४ लाख बोगस मतदार? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप|VIDEO

क्रीडा विश्वाला मोठा धक्का; माजी दिग्गज क्रिकेटपटूने घेतला जगाचा निरोप

SCROLL FOR NEXT