Amit Shah  Amit Shah
देश विदेश

Assembly Election Result 2024 : हरियाणासारखा करिश्मा जम्मू काश्मीरमध्ये होणार का? त्या १० जागा गेमचेंजर ठरणार!

Jammu-Kashmir Election Result: जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीत सध्या काँग्रेस आणि एनसी आघाडीला बहुमत मिळाले आहे. पण १० जागांवर अपक्ष आघाडीवर आहे.

Namdeo Kumbhar

Jammu-Kashmir Election Result 2024 Live: जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणूक निकालाच्या ताज्या आकडेवारीनुसार काँग्रेस आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. नॅशनल कॉन्फ्रेन्स ३९ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला ८ जागांवर आघाडी मिळाली आहे. म्हणजेच, जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एनसी आघाडी ४७ जागांवर पुढे आहेत. ९० जागा असणाऱ्या जम्मू काश्मीर विधानसभेला बहुमतासाठी ४६ जागावर विजय मिळवावा लागणार आहे.

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजप सध्या २८ जागांवर आघाडीवर आहे. महत्वाचं म्हणजे, घाटीमध्ये भाजपला विजय मिळत असल्याचे दिसत आहे. तर शोपया मतदारसंघात भाजपचे उमेदवार जाविद अहमद कादरी पुढे आहेत. अन्य आठ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

हरियाणामध्ये ज्याप्रमाणे भाजपने सुरुवातीच्या पडझडीनंतर मुसंडी मारली, तशीच अवस्था जम्मू काश्मीरमध्ये होईल का? असा प्रश्न आहे. काही स्थानिक नेत्यांच्या मते जम्मू काश्मीरमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल.

जम्मू काश्मीरमधील निवडणूक निकालात थोडा बदल झाला तर त्रिशंकू होण्याची शक्यता आहे. काँग्रेस एनसी आघाडी बहूमतापासून दूर राहिल्यास अपक्ष आणि अन्य उमेदवारांची भूमिका महत्वाची राहणार आहे. आशा परिस्थितीमध्ये भाजप सत्तास्थापनेचा प्रयत्न करु शकतो.

कोणत्या मतदारसंघात कोणते अपक्ष आघाडीवर

1- राफियाबाद मुजफ्फर - अहमद डार

2- बांदीपोरा - उस्मान अब्दुल मजीद

3- ईदगाह - गुलाम नबी भट

4- ऊधमपुर ईस्ट - पवन खजूरिया

5- बानी - डॉ. रामेश्वर सिंह

6- चंबा - सतीश शर्मा

7- थन्नामंडी(एसटी) - मुजफ्फर इकबाल खान

8- सुरनकोट(एसटी) - चौधरी मोहम्मद अकरम

सज्जाद लोन पक्षाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर -

सज्जाद लोन यांचा पक्ष हंदवाडा आणि लंगेट या दोन जागांवर जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स पक्षाच्या उमेदवाराच्या पुढे आहेत. हंदवाडामध्ये चौथ्या फेरीपर्यंत सज्जाद गनी लोन 919 मतांनी आघाडीवर आहेत. लंगेट मतदारसंघात मतमोजणीच्या चौथ्या फेऱ्यांनंतर इरफान सुलतान 1217 मतांनी पुढे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT