Amarnath Yatra latest news Saam Tv
देश विदेश

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा डाव उधळला, 'लश्कर'चे २ दहशतवादी अटकेत, स्फोटकांचा मोठा साठा जप्त

साम वृत्तसंथा

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) रियासी जिल्ह्यातील तुकसानमधील ग्रामस्थांनी लश्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना शस्त्रसाठ्यासह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून दोन रायफल, ७ ग्रेनेड आणि पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. पोलीस महासंचालकांनी दहशतवाद्यांना पकडून देणाऱ्या ग्रामस्थांना दोन लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

जम्मू-काश्मीरचे (Jammu Kashmir) उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही रियासी जिल्ह्यातील तुकसान गावात लश्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना पकडून देणाऱ्या दक्ष ग्रामस्थांना पाच लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली आहे. फैजल अहमद डार आणि राजौरी येथील तालीब हुसैन अशी या दोघांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. फेजल हा लश्कर ए तोयबामधील ए श्रेणीतला दहशतवादी आहे, अशी माहिती समोर आली आहे.

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात लश्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना तुकसान गावातील ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठी सापडला आहे. तो पोलिसांनी जप्त केला आहे. लश्कर ए तोयबाने अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट रचला होता, अशी माहिती समोर आली आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंना लक्ष्य करण्यात येणार होते. अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या कटात सामील असलेल्या मास्टरमाइंडचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालिब हुसैन याने यापूर्वी राजौरीमध्ये दोन आयईडी स्फोटांची चाचणी घेतली होती. त्यानंतर शस्त्रे घेऊन तो राजौरीतून पळाला होता. तर त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी राजौरीतच आठवडाभरापूर्वी पकडले होते.

पोलीस (Police) सूत्रांच्या माहितीनुसार, काश्मीर येथील फैजल अहमद हा लश्कर ए तोयबातील ए श्रेणीतील दहशतवादी आहे. सीमेपलीकडे अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्यासाठी त्याला तालिब हुसैनशी संपर्क साधण्यास सांगितले होते, अशी माहिती समोर येत आहे. तालिब हुसैन यानेच अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्यानुसार दोघेही रियासीमधील तुकसान गावात गेले होते. रचलेला कट यशस्वी होण्याच्या आधीच पोलीस आणि स्थानिकांनी या दोन्ही दहशतवाद्यांना एका घरातून पकडले. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख, जाणून घ्या;सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT