Jaipur-Mumbai Express Firing Saam tv
देश विदेश

Jaipur-Mumbai Express Firing Case: मानसिक रुग्ण नव्हता कॉन्स्टेबल चेतन सिंग, चार्जशीटमध्ये झाला खुलासा

Bharat Jadhav

Jaipur-Mumbai Express Firing Case:

मुंबई-जयपूर सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करणारा आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंगच्याविरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल करण्यात आलीय. या चार्जशीटमध्ये एक धक्कादायक खुलासा झालाय. ३१ जुलै रोजी कॉन्स्टेबल चेतन सिंग याने आपल्या सर्व्हिस रायफलने एएसआयसह तीन लोकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. रेल्वेत गोळीबार करताना चेतनची मानसिक स्थिती ठीक होती, असा खुलासा चार्जशीटमध्ये करण्यात आलाय. (Latest News)

गोळीबार करताना चेतनची मानसिकस्थिती ठीक नव्हती असा दावा करण्यात येत होता. परंतु त्याने डोकं शांत ठेवून गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करणारे रेल्वे पोलीसने या घटनेसंबंधात आरोपपत्र दाखल केलंय. गोळीबार करताना चेतन सिंगची मानसिक स्थिती चांगली होती आणि तो काय करत होता हे त्याला माहिती होतं. मुंबईच्या एका स्थानिक न्यायालयात जीआरपीने १००० पानांचे आरोप पत्र दाखल केलं आहे. जीआरपीच्या मतानुसार, या आरोपपत्रात १५० पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जीआरपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अंतर्गत बोरीवली मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेटच्या न्यायालयात जबाब नोंदवण्यात आलाय. न्यायालयात तीन साक्षीदारांचा जबाब नोंदवलाय. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी रेल्वेमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये चेतन सिंग हा रेल्वेच्या डब्यांमध्ये फिरताना दिसतोय.

गोळीबारीची घटना घडल्यानंतर म्हटलं जात होतं की, आरोपी रागात होता आणि त्यांची मानसिक स्थिती अस्थिर होती. कॉन्स्टेबल चेतन सिंगने मुस्लिमांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर एएसआयने त्याला विरोध केला. याचा राग आल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर तेथे असलेले तीन प्रवाशांवर गोळ्या झाडण्यात आल्या. आरोपी कॉन्स्टेबलने मुस्लीम आणि पाकिस्तानविरोधात अपशब्द बोलत असल्याचं व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.

आरपीएफच्या म्हणण्यानुसार, ही घटना ३१ जुलै रोजी पहाटे ५.२३ च्या सुमारास जयपूर- मुंबई एक्स्प्रेस (१२९५६) मध्ये घडली होती. रेल्वे प्रोटेक्शन फोर्समधील कॉन्स्टेबलने आपल्या ऑटोमॅटिक रायफलने सहाय्यक पोलीस निरीक्षक (एएसआय) ला गोळी मारली होती. आरोपी हवालदार चेतनकुमार चौधरी आणि एएसआय टिकाराम मीना हे एस्कॉर्ट ड्युटीवर होते.

त्यावेळी त्याने टिकारामवर गोळी झाडली होती. त्यावेळी चेतनने आणखी तीन प्रवाशांवरही गोळ्या झाडल्या होत्या. घटनेच्या वेळी रेल्वे गुजरातहून महाराष्ट्राकडे येत होती. पालघर रेल्वे स्थानकाजवळ ही एक्स्प्रेसमध्ये आल्यानंतर रेल्वेच्या कोच बी-५ मध्ये गोळीबार झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT