PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

पंतप्रधानांवर जादूटोणा? शेंदूरचं रिंगण अन् ९ लिंबू, धागे बांधलेले ४ नारळ; स्मशानभूमीजवळ सापडला मोदींचा फोटो

PM Modi Photo : मऊ येथील स्मशानभूमीजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सापडला आहे. या फोटोसोबत लिंबू, नारळ, लाल पवित्र धागे (कलावा) आणि शेंदूर यांसारख्या वस्तूही आढळून आल्या आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आलीय. जिल्ह्यातील दोहरीघाट भागातील एका स्मशानभूमीजवळ पंतप्रधान नरेंद्र यांचा फोटो सापडला, हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसलाय. या फोटोच्या भोवती नारळ, लिंबू, लाल धागा आणि शेंदूर यांसारख्या वस्तूही ठेवलेल्या आढळल्या. एका लिंबात मुद्दाम सुई खुपसण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झालाय.

मात्र, या व्हायरल व्हिडिओची किंवा छायाचित्रांची सत्यता साम टीव्हीनं पडताळली नाहीये. परंतु हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ही घटना दोहरीघाट परिसरातील सरयू नदीच्या काठी असलेल्या स्मशानभूमीजवळ घडल्याचे सांगण्यात येतेय. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सापडलाय. या फोटोच्या भोवती नारळ, लिंबू, शेंदूर आणि सुयांसारख्या वस्तू आढळल्या आहेत.

ज्या गोष्टींचा संबंध थेट तंत्रमंत्रासाठी किंवा काळ्या जादूसाठी केला जातो. ज्या पद्धतीने या वस्तू मांडून ठेवल्या होत्या, त्यावरून हा प्रकार जादूटोणा करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय. मात्र हे कृत्य कोणी केले किंवा त्यामागचा उद्देश काय होता, याबद्दल सध्या कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाहीये.

पंतप्रधान मोदींचा फोटो व्हिडिओ व्हायरल

स्मशानभूमीच्या परिसरात जादूटोण्याशी संबंधित काही वस्तू आणि त्यासोबत पंतप्रधान मोदींचा एक फोटो सापडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकारामुळे लोकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रकरण थेट पंतप्रधान मोदींशी संबंधित असल्याने, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत तपास सुरू केलाय.

पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात अधिकृत गुन्हाही दाखल केलाय. दोहरीघाट पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी म्हणाले की, याप्रकरणाचा तपास केला जातोय. तपासानंतर कारवाई केली जाईल. दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष रामाश्रय मौर्य म्हणाले की, ही कृती आरजकता माजवणाऱ्यांनी केलीय. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Risk: कोलेस्ट्रॉल आणि बीपी नॉर्मल असतानाही येतोय हार्ट अटॅक! डॉक्टर म्हणाले, आधी तपासा 'ही' १ गोष्ट

मांसाहारी पदार्थांची चव वाढवण्यासाठी हा सिक्रेट मसाला नक्की ट्राय करा

लघुशंकेला घराबाहेर पडले, सापाने दंश केला; रुग्णालयात भाजपच्या स्थानिक नेत्याचा मृत्यू

Women Health : महिलांमध्ये झपाट्याने वाढतोय हाडे पोकळ करणारा 'हा' गुप्त आजार, कोणतीही लक्षणे न दिसताच वाढतो धोका

रात्रीच्या वेळी मृतदेह एकटा का सोडत नाहीत? जाणून घ्या यामागील धार्मिक कारण

SCROLL FOR NEXT