Israel Hamas War Saam Tv
देश विदेश

Airstrikes In Gaza: इस्रायली सैन्याचा गाझामध्ये पुन्हा कहर; हवाई हल्ल्यात १८ जणांचा मृत्यू

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धाला चार महिने झाले आहेत. पण युद्ध अजून थांबले नाही. इस्रायली सैन्याने केलेल्या भीषण हवाई हल्ल्याने गाझामध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे.रात्रभर झालेल्या या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात १८ जण ठार झाले असून डझनभर लोक जखमी झाले आहेत.

Bharat Jadhav

Israeli Air Strike On Gaza:

इस्रायल-हमास युद्धाला चार महिने झाले आहेत. पण युद्ध अजून थांबले नाही. इस्रायली सैन्याने केलेल्या भीषण हवाई हल्ल्याने गाझामध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे. रात्रभर झालेल्या या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात १८ जण ठार झाले असून डझनभर लोक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक बनलीय. (Latest News)

इस्रायली लष्कराने गाझावर आणखी एक मोठा हवाई हल्ला केलाय. या हवाई हल्ल्याने खळबळ उडाली आहे. इस्रायली सैन्याने शनिवारी रात्री गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. यात १८ लोक ठार झालेत तर तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. वैद्यकीय कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींनी रविवारी या हल्ल्याची माहिती दिली. दरम्यान युनायटेड नेशन्समध्ये युद्धबंदीचा प्रस्ताव मांडल्यास पुन्हा व्हेटो पॉवरचा वापर करू, असे अमेरिकेने म्हटलंय. अमेरिका हा इस्रायलचा जवळचा मित्र आहे. ओलीसांची सुटका करण्यासाठी इस्रायल आणि हमास यांच्यात चर्चेला ते अनुकूल आहेत.

गाझा मधील नासेर रुग्णालयावर मागील आठवड्यात इस्राईलच्या सैन्याने केलेल्या कारवाईमुळे आता या रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणे शक्य होत नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या(डब्लूएचओ) वतीने देण्यात आलीय. ‘डब्लूएचओ’चे अध्यक्ष डॉ. डॉ टेड्रोस अधानोम घेब्रायसिस यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CNG आणि PNG च्या दरांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या ताजे दर

Bus Accident : पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भयंकर अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Pravin Tarde : 'देऊळ बंद २'च्या धामधूमीत प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; चाहत्यांना दिलं भन्नाट सरप्राइज, वाचा नेमकं काय म्हणालं?

Manoj Jarange : पुन्हा आंदोलनाची ठिणगी!रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील करणार आमरण उपोषण; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT