Israel Attacks Iran today Saam tv
देश विदेश

Israel Attacks Iran : इस्रायलचा पुन्हा एकदा इराणवर हल्ला; राजधानी तेहरानमध्ये नागरिकांची पळापळ, धडकी भरवणारा व्हिडिओ

Israel Attacks Iran today : इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केलाय. यामुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये नागरिकांची पळापळ झाली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Vishal Gangurde

इराणची राजधानी तेहरान रविवारी पुन्हा एकदा हल्ल्याने हादरलं आहे. इस्रायलने पुन्हा एकदा इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला. इराणच्या मंत्रालय, पोलीस मुख्यालय, लोकवस्तीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर तेहरानमधील नागरिकांची एकच पळापळ सुरु झाली. यामुळे उत्तर तेहरान, हराज रोडवर लोकांची मोठी गर्दी झाली आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, इस्त्रालयाने मंत्रालयावरील काही विभागावरही क्षेपणास्त्र डागले आहेत. इराणने पोलीस मुख्यालयाजवळ मोठा स्फोट झाल्याला घटनेला दुजोरा दिला आहे. इराणमधील मीडिया रिपोर्टनुसार, इस्त्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या हल्ल्यात नेमकं किती नुकसान झालं, याची माहिती समोर आलेली नाही.

इस्त्रायलच्या मीडिया रिपोर्टनुसार, तेहरानमधील अनेक महत्वाच्या ठिकाणावर हल्ले केले. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, काही वेळापूर्वी हा हल्ला झाला आहे. इराणमधील दिग्गज नेत्यांनी युद्ध संपवण्याचं आवाहन केलं होतं. दुसरीकडे अमेरिकेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केली की, आमच्या देशाला युद्ध नको. परंतु हल्ले सुरु राहिले तर आमचं सैन्य दल आणि इतर गार्ड्स दुपट्टीने प्रत्युत्तर देईल. अमेरिकेची भूमिका इराणला चोख प्रत्युत्तर देण्यास भाग पाडत आहे. इराणने ही भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केली.

इस्त्रायलच्या हवाई दलाने माहिती दिली की, रविवारी जॉर्डन खोऱ्यात आकाशातील इराणी ड्रोन पाडला गेला. दिवसभरात इराणने अनेक ड्रोन डागले. त्यातील बहुतांश ड्रोनला हवेतच नष्ट करण्यास इस्त्रायला यश आलं आहे. यावरून दोन्ही देशामधील घनघोर संघर्ष सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.

तेहरानच्या खोमैनी विमानतळावरही हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं. परंतु विमानतळ अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही हल्ला झाला नसल्याचं सांगितंल. इराण इंटरनॅशनलच्या व्हिडिओमध्ये विमानतळाजवळ स्फोट आणि धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहे. यावरून विमानतळाच्या आसापासच्या भागांना इस्त्रायलने लक्ष्य केल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT