Massive destruction in Beirut after deadly airstrikes hit densely populated areas. saam tv
देश विदेश

इस्रायलकडून बेरूतवर भीषण बॉम्ब हल्ला,११२ जण ठार आणि ८०० हून अधिक जण जखमी

Israel Airstrikes In Beirut: इराणसोबत शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर इस्रायलने बेरूतमध्ये भीषण बॉम्ब हल्ला केला आहे. मात्र ही शस्त्रसंधी हिजबुल्लाहसोबतच्या लढाईला लागू होत नाही, असे इस्रायलने म्हटले आहे.

Bharat Jadhav

  • बेरूतवर इस्रायलचा भीषण हवाई हल्ला

  • १०० हून अधिक मृत्यू, ८०० पेक्षा जास्त जखमी

  • इराणसोबत शस्त्रसंधीनंतरही हल्ला

इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविराम जाहीर झाल्यानंतर काही तासांतच इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतवर हल्ला केला. हे हवाई हल्ले बेरूतच्या दाट लोकवस्तीच्या भागात करण्यात आले. रहिवाशी वस्तीत झालेल्या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना इस्रायलने स्पष्टपणे सांगितले की, इराणसोबतचा शस्त्रसंधी झाली आहे. हे लेबनॉनमधील इराण-समर्थित हिजबुल्ला गटाविरुद्धच्या लढ्याला लागू होत नाही.

हिजबुल्लाहच्या १०० हून अधिक ठिकाणांवर हल्ले

दरम्यान इराण आणि अमेरिका, इस्रायलच्यातील शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानने मध्यस्थी केली होती. इस्त्रायलने केलेल्या बेरूतमधील हल्लायवरून पाकिस्तानने म्हटले आहे की, इराणसोबतच्या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीमुळे इस्रायलने लेबनॉनमधील हल्ले थांबवणे देखील बंधनकारक आहे. परंतु इस्रायलने याचे पालन करण्यास नकार दिला आहे. इस्रायली सैन्याने मध्य बैरूत, दक्षिण लेबनॉन आणि पूर्व बेका खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत.

केवळ १० मिनिटांत हिजबुल्लाहच्या १०० हून अधिक लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. इस्रायली लष्कराने या हल्ल्याचे वर्णन संपूर्ण युद्धातील सर्वात मोठा हल्ला असे केले आहे. हल्ल्यांनंतर बेरूतच्या अनेक भागांवर दाट, काळ्या धुराचे लोट पसरले. एका निवासी इमारतीला आग लागली. अनेक वाहनांचे नुकसान झाले. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान ११२ जण ठार आणि किमान ८३७ जण जखमी झाले आहेत. अनेक हल्ले दुकाने आणि बाजारपेठा असलेल्या गजबजलेल्या भागांमध्ये झाले.

इस्रायली लष्कराने हिजबुल्लाहची क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे, नियंत्रण केंद्रे आणि गुप्तचर यंत्रणांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. इस्रायली लष्कराने हिजबुल्लाहवर आरोप केलाय की, सामान्य नागरिकांना मानवी ढाल बनवतात. "लेबनॉन आणि तेथील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी, हिजबुल्लाहला निवासी भागांमध्ये तळ आणि शस्त्रनिर्मिती सुविधा उभारण्यापासून रोखणे अत्यावश्यक आहे," असे इस्रायली लष्करी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT