Iran-Israel War  Saam Tv News
देश विदेश

युद्धाची नांदी, जगाची बरबादी; इस्त्रायल- इराण युद्धानं जग होरपळणार? तेलाच्या किंमती गगनाला भिडणार?

Iran-Israel War : अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे युद्धात जग होरपळणार असल्याचं चित्र निर्माण झालाय. त्यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढणार असून इतर देशांवर युद्धांचा काय परिणाम होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेमुळे मोठी ठिणगी पडलीय. अमेरिकेनं इस्त्रायलला मदत करत थेट इराणच्या अणुप्रकल्प केंद्रावरच हल्ला केलाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्त्रायलवर ३० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलमधील तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेम या शहरापर्यंत या हल्ल्याची झळ पोचली आहे. एकीकडे इस्रायलवरील ह्ल्ले तीव्र करताना इराणने अमेरिकेलाही थेट इशारा दिलाय.त्यामुळे आता हा संघर्षं अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे..आणि याचा जगावर काय परिणाम होणार?

युद्धाची नांदी, जगाची बरबादी

क्रूड ऑईलच्या किंमतीत तब्बल 18 टक्क्यांची वाढ

क्रूड ऑईलची किंमती 75 डॉलर्स वरून 120 प्रति बॅरल होण्याची शक्यता

कच्च्या तेलाची निर्यात होणारी होर्मुझ सामुद्रधुनी हाय रिस्क झोन म्हणून घोषित

शिपिंग कंपन्यांनी होर्मुझऐवजी पर्यायी मार्गाची निवड

त्यामुळे तेल निर्यातीसाठी लागणाऱ्या वेळेत आणि खर्चात वाढ

दुसरीकडे

यमनमधील हूथी, इराकमधील शिया मिलिशिया, लेबनॉनमधील हिझबुल्ला हे गटही अमेरिका-इस्रायलविरोधी कारवाया करतील

इराण अधिक गुप्तपणे अणुशस्त्र प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करू शकतो

उत्तर कोरिया, चीनसारख्या देशांकडून इराणला तांत्रिक मदत मिळण्याची शक्यता

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेविरोधात रशिया, चीन आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता

इराण-इस्रायल युद्धाची ठिणगी आता जागतिक महासंकटाला जन्म देऊन गेलीये. मध्य पूर्वेतील या युद्धाचा पेटलेला वणवा सध्या तरी थांबणार नाहीय, इंधनाच्या वाढत्या किंमती आणि अण्वस्त्र हल्ल्याची डोक्यावर असलेली टांगती तलवार जगाला अस्थिरतेच्या दरीत लोटतेय. युद्ध हा कुठल्याच समस्येवर उपाय नाही. यात परवड ही सर्व सामान्यांची होणार हे निश्चितये त्यामुळे हेच या बलाढ्य आणि स्वताला महासत्ता समजणाऱ्या देशाच्या प्रमुखांना कधी समजणार असाच प्रश्नयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT