देश विदेश

Israel-Hamas war: गाझामध्ये लवकरच होणार युद्धविराम; UNSC मध्ये प्रस्ताव मंजूर

Israel-Hamas war: गाझामध्ये युद्धविराम करण्याप्रकरणी युनायटेड नेशन सिक्योरिटी काउंसिलमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आलाय. अमेरिकाने या प्रस्तावावर मतदान केलेले नाहीये परंतु युद्धविरोम करण्याच्या पक्षात १४ मते मिळाली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Israel-Hamas war:

गाझामध्ये युद्धविराम करण्याप्रकरणी संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. परंतु अमेरिकाने या प्रस्तावावर मतदान केले नाहीये.पण प्रस्तावाच्या बाजुने १४ मते पडली आहेत. हा प्रस्ताव निश्चित लागू झाला पाहिजे,असं युएनएससीचे सरचिटणीस एंटीनिया गुटरेस म्हणालेत. (Latest News)

गुटेरेस यांनी आपल्या एका पोस्टमध्ये सांगितले की, सुरक्षा परिषदने गाझामधील बहुप्रतिक्षित प्रस्तावाला मंजुरी दिलीय. यात तात्काळ युद्धविराम आणि सर्व ओलीसांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याची मागणी करण्यात आली होती.” “या प्रस्तावाची अंमलबजावणी व्हायला हवी.

गाझामध्ये बंदी असलेल्या लोकांच्या सुटकेची अमेरिका सातत्याने मागणी करत आहे. मात्र यूएनएससीने मंजूर केलेल्या ठरावात त्या ओलीसांच्या सुटकेचीही मागणी करण्यात आली होती, मात्र अमेरिका त्यावर मतदान करण्यापासून दूर राहिलाय. अमेरिकेने यापूर्वीही सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता, ज्याला रशिया आणि चीनने व्होटो केला होता. त्या प्रस्तावात "तात्काळ आणि शाश्वत युद्धविराम" ची मागणी करण्यात आली होती.

गाझामध्ये युद्धबंदीच्या मागणीच्या प्रस्तावाला अमेरिकेने व्हेटो न दिल्याने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त झालेत. गाझामधील युद्धविरामासाठी यूएनएससीच्या प्रस्तावाला व्होटो न दिल्यास ते नियोजित शिष्टमंडळ वॉशिंग्टनला पाठवणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे अमेरिका युद्धविरामासाठी इस्रायलवर सतत दबाव आणत होता.

त्यावरून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होती. सोमवारी स्वीकारण्यात आलेला प्रस्ताव अमेरिका, इजिप्त आणि कतार यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींवर परिणाम करू शकतात, असा इशारा अमेरिकेने दिला. उदाहरणार्थ, गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री सतत मध्यपूर्वेला भेट देत आहेत आणि गाझामधील ओलीसांच्या सुटकेवर ठळकपणे चर्चा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT