Pm Netanyahu Apologized To Intelligence Agencies saam tv
देश विदेश

Israel-Hamas War: 'माझं चुकलं, Sorry...', इस्रायलचे PM नेतन्याहू यांनी गुप्तचर यंत्रणांची मागवली माफी

Pm Netanyahu News: 'माझं चुकलं, Sorry...', इस्रायलचे PM नेतन्याहू यांनी गुप्तचर यंत्रणांची मागवली माफी

Satish Kengar

Pm Netanyahu Apologized To Intelligence Agencies:

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा रविवारी २३ वा दिवस आहे. मित्रपक्ष आणि विरोधकांकडून तीव्र टीकेचा सामना करत असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या एका जुन्या वक्तव्याबद्दल गुप्तचर यंत्रणांची माफी मागितली आहे.

ते म्हणाले आहेत की, ''मी चुकलो. मी जे बोललो, ते योग्य नव्हतं, यासाठी मी माफी मागतो. मी सर्व गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांचं समर्थन करतो.'' 7 ऑक्टोबर रोजी हमासचा प्राणघातक हल्ला रोखण्यात गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याबद्दल नेतान्याहू यांनी टीका केली होती. यानंतर आता त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागील आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांनी ट्वीट करत ही टीका केली होती. आता त्यांनी आपलं जून ट्वीट डिलीट केलं आहे. नेतान्याहू यांनी नवीन ट्वीट करत माफी मागितली आहे. यात ते म्हणाले आहेत की, ''मी सुरक्षा सेवांच्या सर्व प्रमुखांचं समर्थन करतो. मी IDF चीफ ऑफ स्टाफ आणि IDF च्या कमांडर आणि सैन्याचे समर्थन करतो, जे आघाडीवर राहून आपल्या घरासाठी लढत आहेत.'' (Latest Marathi News)

काय म्हणाले होते नेतान्याहू?

पंतप्रधान नेतन्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलं होतं की, ''हमास हल्ला करणार आहे, याची कोणतीही माहिती त्यांना मिळालेली नव्हती. गुप्तचर प्रमुख आणि शिन बेटच्या प्रमुखासह सर्व सुरक्षा सेवांचे असे मत होते की, हमास घाबरला होता आणि त्यांना तडजोड करायची होती.'' त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका झाली होती. यानंतर त्यांनी पोस्ट डिलीट केली.

दरम्यान, त्यावेळी या मोठ्या अपयशाची जबाबदारीही अनेक सुरक्षा प्रमुखांनी स्वीकारली होती. त्यांच्या (नेतान्याहू) वक्तव्यावर मी उत्तर देणार नाही, असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगरी यांनी त्यावेळी सांगितले होते. आम्ही आता युद्धात आहोत आणि त्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT