Israel-Palestine Tension Saam TV
देश विदेश

Israel-Palestine Tension : इस्राइल-हमास संघर्षात १०००हून अधिक बळी; कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ

Israel-Palestine News Update : इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे गाझामध्ये 1.23 लाख पॅलेस्टिनी नागरिक बेघर झाल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे.

प्रविण वाकचौरे

Israel-Palestine War :

हमास या दहशतवादी संघटनेच्या  इस्राइलवरील हल्ल्यांमध्ये मृतांती संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे इस्रायलने गाझा पट्टीत दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. या संघर्षात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 1000 हून अधिक बळी गेले आहेत. इस्रायलमध्ये आतापर्यंत 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, गाझा पट्टीमध्ये 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे गाझामध्ये 1.23 लाख पॅलेस्टिनी नागरिक बेघर झाल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. सुमारे 74 हजार लोकांनी शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांमध्ये काम करताना अडचणी येत आहेत. (Latest News)

इस्रायलवरील हमासचा हल्ला 9/11 सारखाच

इस्रायल -हमास युद्धाच्या दुसऱ्या दिवशी इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) सांगितले की, इस्रायलवरील हमासचा हल्ला 9/11 सारखाच आहे. पण त्याहूनही मोठा आहे. हमासने केलेला हल्ला अभूतपूर्व घटना असून गेले 24 तास अत्यंत कठीण होते.

आयडीएफचे प्रवक्ते रिचर्ड हेच यांनी सांगितले की, हा इस्रायलवरील 9/11चा हल्ला किंवा त्याहूनही मोठा हल्ला आहे. हृदय पिळवटून टाकणारी आणि अभूतपूर्व अशी ही घटना आहे. हमासला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही याला अतिशय गंभीरपणे उत्तर देणार आहोत. असे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहेत.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

इस्राइल-हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम तेलाच्या किमतीवरही दिसून येत आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे तेलाच्या किमती तीन टक्क्यांनी वाढल्या आहेत.

संयुक्त राष्ट्राची बैठक

संयुक्त राष्ट्राने दोन्ही बाजूंना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्राने म्हटले की, इस्राइल-हमास यांच्यातील युद्ध स्थितीवर बैठक झाली. ज्यामध्ये मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. लेबनॉनमधूनही इस्रायलवर हल्ले झाले आहेत. हिजबुल्लाहने हा हल्ला केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला संपवलं, भरचौकात ४ गोळ्या झाडल्या; थरारक VIDEO समोर

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

SCROLL FOR NEXT